AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 7July 2024 : एकाच आठवड्यात चांदीची 5 हजारांची मुसंडी, तर सोन्याने दाखविला ‘जलवा’; आता भाव तरी काय

Gold Silver Rate Today 7 July 2024 : या आठवड्यात चांदीने दरवाढीचे तुफान आले. जून महिन्यातील सर्व कसरच जणू जुलैच्या पहिल्या सत्रात भरुन काढली. सोन्याच्या किंमतीत चढउतार झाला. अखरेच्या सत्रात सोन्याने दणका दिला. या आठवड्यात मौल्यवान धातूचा भावफलक हलता होता.

Gold Silver Rate Today 7July 2024 : एकाच आठवड्यात चांदीची 5 हजारांची मुसंडी, तर सोन्याने दाखविला 'जलवा'; आता भाव तरी काय
सोन आणि चांदीचे धक्कातंत्र
| Updated on: Jul 07, 2024 | 8:35 AM
Share

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच चांदी चमकली. चांदीने एका दमात जवळपास 5 हजारांची उडी घेतली. चांदीच्या या दरवाढीने ग्राहकांना धक्का बसला. सोन्यात या आठवड्यात चढउताराचे सत्र दिसून आले. जून महिन्यातील महागाईची कसर जुलैच्या पहिल्याच सत्रात चांदीने वसूल केली. बजेटपूर्वी चांदी अजून किती झेप घेणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. जगातील मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदी कमी केली असली तरी गुडरिटर्न्सनुसार, सोन्याने या आठवड्यात ग्राहकांना दोनदा जोरदार झटका दिला. चांदीने मात्र सलग सहा दिवस दमदार बॅटिंग केली आहे. काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती? (Gold Silver Price Today 7 July 2024 )

सोने 1500 रुपयांनी वधारले

या आठवड्यात सोन्याची किंमत 800 रुपयांनी वाढली. सोन्याच्या दरात चढउताराचे सत्र दिसून आले. 2 जुलै 110 तर 4 जुलै रोजी सोन्याने 710 रुपयांची उडी घेतली. मध्यंतरी भावात बदल झाला नाही. त्यानंतर 6 जुलै रोजी सोने 710 रुपयांनी उसळले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची तुफान बॅटिंग

जून महिन्यात चांदीला सूर गवसला नव्हता. जुलैमध्ये चांदीने सर्व कसर एकदाच भरुन काढली. 1 जुलैला चांदी 200 तर 2 जुलैला 800 रुपयांनी, 3 जुलैला 500 रुपयांनी तर 4 जुलै रोजी चांदीने 1500 रुपयांची मुसंडी मारली. 5 जुलै रोजी त्यात 200 रुपयांची भर पडली. अखरेच्या सत्रात 6 जुलै रोजी चांदीत 1600 रुपयांची मोठी उसळी आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 94,800 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारले. 24 कॅरेट सोने 72,640 रुपये, 23 कॅरेट 72,349 रुपये, 22 कॅरेट सोने 66,538 रुपये झाले. 18 कॅरेट 54,480 रुपये, 14 कॅरेट सोने 42,494 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 90,709 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?