AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 8 August 2024 : गुडन्यूज, 10 ग्रॅम सोने झाले इतके स्वस्त, तर किलोमागे चांदीत मोठी घसरण, खरेदीची करा लगबग

Gold Silver Rate Today 8 August 2024 : या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. सोने दणकावून आपटले तर चांदीत मोठी घसरण झाली. ग्राहकांना आता खरेदीची सुवर्णसंधी आहे. गुंतवणूकदारांची चांदीच चांदी आहे.

Gold Silver Rate Today 8 August 2024 : गुडन्यूज, 10 ग्रॅम सोने झाले इतके स्वस्त, तर किलोमागे चांदीत मोठी घसरण, खरेदीची करा लगबग
सोने - चांदीचा भाव
| Updated on: Aug 08, 2024 | 8:28 AM
Share

या आठवड्याच्या पहिल्याच सत्रात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. सलग दुसऱ्या दिवशी मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सोमवारी सोने किंचित उतरले होते. त्यानंतर त्यात घसरणीचे सत्र सुरु झाले. तर चांदीत या दोन दिवसांत मोठी स्वस्ताई आली. या धातूच्या किंमती उतरल्याने आगामी रक्षाबंधनासाठी लाडक्या बहिणीसाठी महागडे गिफ्ट घेण्याची नामी संधी भावाकडे आहे. किंमती उतरल्याने त्याच्या खिशाला मोठी झळ बसणार नाही. आता काय आहेत या धातूच्या किंमती?(Gold Silver Price Today 8 August 2024 )

सोने झाले की स्वस्त

या आठवड्याच्या पहिल्या सत्रात सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. सोमवारपासून सोने उतरले आहे. सोमवारी सोने किंचित उतरले. 6 ऑगस्ट रोजी बेशकिंमती धातूत 870 रुपयांची घसरण झाली. 7 ऑगस्ट रोजी भाव 440 रुपयांनी उतरले. आज सकाळच्या सत्रात दर घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 63,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत मोठी पडझड

गेल्या आठवड्यात चांदी 3200 रुपयांनी महागली होती. या पहिल्या सत्रात चांदीत त्याहून मोठी घसरण झाली. सोमवारी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. तर 6 ऑगस्टला किंमती 3200 रुपयांनी उतरल्या. त्यानंतर त्यात 500 रुपयांची घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात पण किंमतीत घसरण दिसत आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 82,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 68,941, 23 कॅरेट 68,665, 22 कॅरेट सोने 63,150 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,706 रुपये, 14 कॅरेट सोने 40,331 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 79,159 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......