AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची पडझड सुरुच, अशा घसरल्या किंमती

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमतीत पडझड झाली. एकूण ऑगस्ट महिन्याचा विचार करता, दरवाढीपेक्षा घसरणच अधिक होती. दोन्ही धातूंना उसळी घ्यायला बळ मिळत नसल्याचे दिसून आले.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची पडझड सुरुच, अशा घसरल्या किंमती
| Updated on: Aug 09, 2023 | 9:23 AM
Share

नवी दिल्ली | 09 ऑगस्ट 2023 : जागतिक बाजारात मोठ्या घडामोडी दिसत आहे. अमेरिकन महागाईच्या आकड्यांची गुंतवणूकदारांना प्रतिक्षा आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था चीनची आहे. तिला पण हादरे बसले आहेत. त्याचा परिणाम बाजारात दिसून आला. सोने-चांदीला माघार घ्यावी लागली. सोने-चांदीच्या किंमतीत पडझड झाली. एकूण ऑगस्ट महिन्याचा विचार करता, दरवाढीपेक्षा घसरणच अधिक होती. दोन्ही धातूंना उसळी घ्यायला बळ मिळत नसल्याचे दिसून आले. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 500 रुपयांनी तर चांदी 3,000 रुपयांनी घसरली होती. तर या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोने-चांदीत (Gold Silver Price Today) किती पडझड होते की दर वाढतात हे संध्याकाळी स्पष्ट होईल.

सोन्यात स्वस्ताई

गुडरिटर्न्सनुसार, ऑगस्ट महिन्यात 1 ऑगस्ट रोजी सोन्याने 150 रुपयांची उसळी घेतली. 2 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची घसरण झाली. 3 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी किंमती कमी झाल्या. 4 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही. 5 ऑगस्ट रोजी सोने 200 रुपयांनी वधारले. 6,7 ऑगस्ट रोजी मोठी दरवाढ झाली नाही. तर 8 ऑगस्ट रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण झाली. सध्या 22 कॅरेट सोने 55,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,210 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. या भावात काय तफावत दिसेल, हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.

चांदी अजून स्वस्त

गेल्या आठवड्यात शेवटच्या सत्रात चांदीने स्वस्ताई आणली. सोमवारी पण चांदीत घसरण दिसून आली. 100 रुपयांनी या किंमती घसरल्या. मंगळवारी चांदीत 1000 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,338 रुपये, 23 कॅरेट 59,100 रुपये, 22 कॅरेट सोने 54,354 रुपये, 18 कॅरेट 44,504 रुपये, 14 कॅरेट सोने 34,713 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,051 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी गर्दी
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
मोठी बातमी! सुप्रिया सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे फक्त एक पद...
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंच्या आमदाराची हजेरी, चर्चांना उधाण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा....
Viral Video | धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची
तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याचा जामीन रद्द, शरण न आल्यास संपत्ती जप्त करण्याचे  हायकोर्टाचे आदेश.

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याचा जामीन रद्द, शरण न आल्यास संपत्ती जप्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश

ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तृणमूलच्या बंडखोर खासदारांबाबत सर्वात मोठी बातमी, लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय.

ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तृणमूलच्या बंडखोर खासदारांबाबत सर्वात मोठी बातमी, लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

IND vs ENG : टीम इंडियात अचानक या गोलंदाजाची एन्ट्री, लॉर्ड्समध्ये प्लेइंग 11 मध्ये मिळणार संधी?.

IND vs ENG : टीम इंडियात अचानक या गोलंदाजाची एन्ट्री, लॉर्ड्समध्ये प्लेइंग 11 मध्ये मिळणार संधी?

सर्वात मोठी बातमी! 6 बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला मंजुरी, ठाकरेंना जबर धक्का!.

सर्वात मोठी बातमी! 6 बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला मंजुरी, ठाकरेंना जबर धक्का!

ठाकरेंच्या 6 खासदारांच्या विलिनीकरणास मंजुरी मिळताच एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; सांगितला पुढचा प्लॅन!.

ठाकरेंच्या 6 खासदारांच्या विलिनीकरणास मंजुरी मिळताच एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; सांगितला पुढचा प्लॅन!