AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सर्वात मोठी पडझड! स्वस्तात करा सोने-चांदीची खरेदी

Gold Silver Rate Today : सोने-चांदी फेब्रुवारीनंतर निच्चांकावर पोहचले आहे. जानेवारी ते एप्रिल महिन्यात सोने-चांदीने नवनवीन रेकॉर्ड केले होते. पण आता दोन्ही धातू घसरणीवर आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हा ट्रेंड आहे..जाणून घ्या सोने-चांदीचा भाव

Gold Silver Rate Today : सर्वात मोठी पडझड! स्वस्तात करा सोने-चांदीची खरेदी
सोने-चांदीचा भाव काय
| Updated on: Jun 24, 2023 | 9:10 AM
Share

नवी दिल्ली : सोने-चांदी फेब्रुवारीनंतर निच्चांकाकडे प्रवास करत आहेत. गेल्यावर्षी दिवाळीनंतर या दोन्ही धातूंनी जोरदार आघाडी उघडली होती. किंमतीचा चढता आलेख पाहता सर्वसामान्यांना धडकी भरली होती. सोन्याच्या किंमतींनी थेट 10 हजारांचा पल्ला गाठला होता. त्यामुळे सोने-चांदी आता सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गेले, यावर शिक्कामोर्तब झाले होते. मोदी सरकारच्या काळात सोने-चांदीने (Gold Silver Rate Today) दुप्पट घौडदौड केली आहे. कधी काळी 25,000-30,000 रुपयांच्या टप्प्यात असणाऱ्या सोन्याने मुसंडी मारली. किंमती दुप्पट झाल्या. . जानेवारी ते एप्रिल महिन्यात सोने-चांदीने नवनवीन रेकॉर्ड केले होते. पण आता दोन्ही धातू घसरणीवर आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हा ट्रेंड आहे..जाणून घ्या सोने-चांदीचा भाव..

भाव जाहीर नाही इंडियन बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशन (ibjarates.com) शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी सोने-चांदीचे भाव जाहीर करत नाही. त्यामुळे या फर्मकडून आज देशभरात सोने-चांदीचे भाव जाहीर करण्यात येत नाही.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी, 23 जून रोजी 24 कॅरेट सोने 58,395 रुपये, 23 कॅरेट 58,161 रुपये, 22 कॅरेट सोने 53,490 रुपये, 18 कॅरेट 43,796 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34161 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीत जवळपास दोन हजारांची घसरण झाली. शुक्रवारी एक किलो चांदीचा भाव 68,304 रुपये होता. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

आठवड्यात उतरले झरझर या आठवड्यात सोने झरझर उतरले. भावात एक हजार रुपयांची घसरण झाली. 19 जून रोजी किंमती 50 रुपये प्रति 10 ग्रॅमने उतरले. 24 कॅरेट सोने 60,210 रुपयांवर आले. त्यानंतर 20, 21 आणि 22 जून रोजी भावात सातत घसरण होत गेली. अनुक्रमे 60, 330 आणि 220 रुपयांनी भाव दणकावून आपटले. गुरुवारी संध्याकाळी भाव 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. शुक्रवारी 430 रुपयांची घसरण झाली. शुक्रवारी संध्याकाळी हा भाव 59,170 रुपये होता. गुडरिटर्न्सवर हे भाव अपडेट झालेले आहेत.

चांदी 3000 रुपयांनी स्वस्त सोने घसरत असताना चांदी वधारली होती. पण या आठवड्यात चांदीचे अवसान गळाले. 19 जून रोजी चांदीत मोठा बदल झाला नाही. 20 जून रोजी 500 रुपयांनी चांदी महागली. 21, 22 आणि 23 जून रोजी भावात 2500 रुपयांची घसरण झाली. अनुक्रमे 1000,1000आणि 500 रुपयांची घसरण दिसून आली. आज 24 जून रोजी सकाळच्या सत्रात चांदीत 400 रुपयांनी पडझड झाली. गुडरिटर्न्सवर हे भाव अपडेट झालेले आहेत.

किंमती मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान