AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today | 2 महिन्यांच्या दरवाढीनंतर पुन्हा गडगडले सोन्याचे भाव, जाणून घ्या आजचा दर…

जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे मंगळवारी (20 एप्रिल) भारतातील सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold Price Today) घट दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) जून वायदा सोन्याच्या भावात 0.29 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

Gold Rate Today | 2 महिन्यांच्या दरवाढीनंतर पुन्हा गडगडले सोन्याचे भाव, जाणून घ्या आजचा दर...
Gold-silver buying
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Apr 20, 2021 | 10:57 AM
Share

मुंबई : जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे मंगळवारी (20 एप्रिल) भारतातील सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold Price Today) घट दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) जून वायदा सोन्याच्या भावात 0.29 टक्क्यांनी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरांत घट दिसत असताना उलट, चांदीमध्ये काहीशी तेजी झाल्याचे दिसले आहे. मे वायद्याच्या चांदीचा दर (Silver Price) 0.45 टक्क्यांनी वाढला आहे. मागील व्यापार सत्रात सोन्याची किंमत वाढून, दोन महिन्यांच्या उच्चांकी किंमतीवर प्रति 10 ग्रॅम 47,850 रुपये झाली होती (Gold silver rate today on 20 April 2021 MCX rate).

सोन्याचे भाव (Gold Price on MCX) : मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जून वायदा सोन्याची किंमत 139 रुपयांनी घसरून, 47245 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. मागील सत्रात सोने 47,850 रुपयांवर पोहोचले होते.

एमसीएक्सवर चांदीचा भाव (Silver Price on MCX) : औद्योगिक मागणीत सुधारणा झाल्यामुळे चांदीला सुगीचे दिवस आले आहेत. एमसीएक्सवर मे वायदा चांदीचे दर 225 रुपयांनी वाढून, 68635 रुपये प्रतिकिलोवर बंद झाले.

जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरांत मंदीचे वातावरण आहे. अमेरिकन ट्रेझरी यील्ड्सच्या रिबाऊंड दरम्यान सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवली गेली. परंतु, कमजोर पडलेल्या डॉलरने ही घसरण काहीशी कमी केली. गेल्या सत्रात प्रति औंस 1,789.77 डॉलरवर पोहोचल्यानंतर, स्पॉट गोल्ड आज 0.2 टक्क्यांनी घसरून 1,766.32 डॉलर प्रति औंस झाले आहे (Gold silver rate today on 20 April 2021 MCX rate).

सोन्याची किंमत या घटकांवर अवलंबून

सोन्याची किंमत ठरविणार्‍या घटकांविषयी बोलताना यामध्ये मागणी आणि पुरवठा, रुपया आणि डॉलरचा विनिमय दर आणि जागतिक बाजारपेठेतील सोन्याची किंमत, महागाई, आयात शुल्क, जीएसटी इत्यादींचा समावेश आहे. जीएसटी आणि इतर स्थानिक कर राज्यानुसार बदलू शकतात. काही व्यवसाय संस्था रिझर्व्ह बँकेने दिलेला दरही स्वीकारतात. अलीकडील काळात सोन्याच्या किमतींबद्दल लोकांमध्ये चर्चा वाढलीय. याकडे आता लक्ष वेधले जाऊ शकते, परंतु वेगवेगळ्या दुकानात सोन्याच्या किमतींमध्ये फरक ही एक सामान्य बाब आहे.

मार्चमध्ये सोन्याची आयात वाढली

भारत सर्वाधिक सोन्याची आयात करणारा देश आहे. देशातील सोन्याच्या मागणीपैकी 70 ते 80 टक्के मागणी अन्य देशांमधून आयात केली जाते. मार्च महिन्यात देशातील सोन्याची आयात विक्रमी पातळीवर पोहोचली. मार्चमध्ये आयात शुल्काची घट आणि किमती कमकुवत झाल्याने सोन्याची आयात वाढली. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर गेली होती.

(Gold silver rate today on 20 April 2021 MCX rate)

संबंधित बातम्या

Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा महागले, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

एलआयसीच्या या पॉलिसीत गुंतवणूक केल्यास मूलं बनू शकतात लखपती, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली