Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा महागले, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

चांदीच्या दरात घट पाहायला मिळालीय. मे वायद्याच्या चांदीच्या किमतीत (Silver Price) 0.7 टक्क्यांनी घसरण झाली. gold silver price today hike 19 april 2021

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:16 PM, 19 Apr 2021
Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा महागले, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव
gold silver price today hike 19 april 2021

नवी दिल्लीः आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव पाहायला मिळाला. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर कमकुवत सुरुवात झाल्यानंतर सोन्याच्या किमती वाढल्या. एमसीएक्सवरील जून वायदा सोन्याचे भाव (Gold Price) 0.30 टक्क्यांच्या वाढीसह व्यापार करत आहे. चांदीच्या दरात घट पाहायला मिळालीय. मे वायद्याच्या चांदीच्या किमतीत (Silver Price) 0.7 टक्क्यांनी घसरण झाली. (Gold Rate Today: Gold Is Expensive Again, Check The Price Of 10 Grams Of Gold)

सोन्याची नवीन किंमत (Gold Price on MCX)

सोमवारी एमसीएक्सवरील जून फ्युचर्सची किंमत 143 रुपयांनी वाढून 47,496 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. जागतिक बाजारात डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याच्या किमती वाढताहेत.

चांदीची नवीन किंमत (Silver Price on MCX)

एमसीएक्सवरील मे वायदाची किंमत 333 रुपयांनी घसरून 68,351रुपये प्रतिकिलो झाली.

या महिन्यात सोने 3000 रुपयांनी महागले

डॉलरमधील कमकुवतपणा आणि अमेरिकन बाँडच्या उत्पन्नातील तोट्यामुळे या महिन्यात भारतातील सोन्याचा भाव 44,000 रुपयांवर आला. या महिन्यात 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 3,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. देशांतर्गतबरोबरच जागतिक स्तरावर या महिन्यात सोन्याच्या किमतीत वाढ झाली.

गेल्या आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीमध्ये 22.58% वाढ

गेल्या आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये सोन्याची आयात 22.58 टक्क्यांनी वाढून 34.6 अब्ज डॉलर म्हणजेच 2.54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सोन्याच्या आयातीचा परिणाम चालू खात्यातील तुटी (सीएडी) वर होतो. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार वाढत्या देशांतर्गत मागणीमुळे सोन्याची आयात वाढली. आकडेवारीनुसार, आर्थिक वर्षात चांदीची आयात 71 टक्क्यांनी घसरून 79.1 कोटी डॉलर्सवर आली. मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये सोन्याची आयात 28.23 अब्ज डॉलर्स होती.

गेल्या आर्थिक वर्षात देशाची व्यापार तूट 98.56 अब्ज डॉलरवर

सोन्याच्या आयातीमध्ये वाढ असूनही गेल्या आर्थिक वर्षात देशाची व्यापार तूट 98.56 अब्ज डॉलरवर गेली. 2019-20 मध्ये ती 161.3 अब्ज डॉलर्स होती. अक्षय तृतीया आणि विवाहाच्या हंगामामुळे सोन्याच्या आयातीमध्ये आणखी वाढ होऊ शकते. यामुळे चालू खात्यातील तूटही वाढेल. परदेशी चलन देशात येणे आणि येथून परत विदेशात जाण्यातील फरकाला सीएडी असे म्हणतात. Gold Rate Today: Gold is expensive again, check the price of 10 grams of gold

संबंधित बातम्या

एलआयसीच्या या पॉलिसीत गुंतवणूक केल्यास मूलं बनू शकतात लखपती, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

तुमचं SBI बँकेत अकाऊंट आहे का? तर मग पटकन करा ‘हे’ काम, अन्यथा अडकतील पैसे

gold silver rate today on 19 april 2021 gold prices hike