AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 29 May 2024 : चांदीची लाखाकडे झेप, सोने महागले, दोन दिवसांत किंमती सूसाट

Gold Silver Rate Today 29 May 2024 : चांदीने या आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठी मजल मारली. गेल्या काही आठवड्यात चांदी लाखाची बात सांगत आहे. सोन्याच्या किंमतीत दोन दिवसांत मोठी उसळी आली आहे. अशा आहेत बाजारात किंमती...

Gold Silver Rate Today 29 May 2024 : चांदीची लाखाकडे झेप, सोने महागले, दोन दिवसांत किंमती सूसाट
सोने-चांदी सूसाट
| Updated on: May 29, 2024 | 8:32 AM
Share

सोने आणि चांदीने गेल्या आठवड्यात दरवाढीला मोठा ब्रेक दिला होता. त्यामुळे सोने 2700 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर चांदीत 6000 रुपयांची घसरण झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूंनी मोठी झेप घेतली. चांदी तर आता लाखाची बात करत आहे. सोन्यातही दोन दिवसांत मोठी उसळी आली आहे. गेल्या दहा वर्षांत सोने आणि चांदी सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. दरवाढीने गुंतवणूकदारांचा मात्र मोठा फायदा झाला आहे. सराफा बाजारात मौल्यवान धातूच्या अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 29 May 2024 )

सोने 500 रुपयांनी वधारले

गेल्या आठवड्यात सोने 75 हजारांहून पुढे गेले होते. तर त्यात 2700 रुपयांची घसरण झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात जवळपास 500 रुपयांची वाढ झाली. 27 मे रोजी सोन्यात 270 रुपयांची दरवाढ झाली. 28 मे रोजी 220 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची तुफान घौडदौड

गेल्या आठवड्यात चांदी 6 हजाराने स्वस्त झाली होती. या आठवड्यात चांदीने मोठी मुसंडी मारली. चांदी 5,000 रुपयांनी वधारली. 27 मे रोजी चांदी 1500 रुपयांनी वधारली. तर 28 मे रोजी चांदी 3500 रुपयांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 72,291 रुपये, 23 कॅरेट 72,002 रुपये, 22 कॅरेट सोने 66,219 रुपये झाले. 18 कॅरेट 54,218 रुपये, 14 कॅरेट सोने 42,290 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 93,120 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना