Gold Rate : सोने-चांदीत आताच करा गुंतवणूक, नाताळात फायदाच फायदा, आजचा भाव काय?

Gold Rate : सोने-चांदीत आता केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा देऊ शकते..

Gold Rate : सोने-चांदीत आताच करा गुंतवणूक, नाताळात फायदाच फायदा, आजचा भाव काय?
सोने-चांदीत कमाईची संधीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 4:39 PM

नवी दिल्ली : सोने-चांदीत (Gold Silver Rate) आता केलेली गुंतवणूक नाताळमध्ये तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकते. वायदे बाजारातील तज्ज्ञांनी (commodity Expert) याविषयीचा अंदाज वर्तविला आहे. पुढील महिन्यात वायदे बाजारात सोन्याला चकाकी येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक (Investment In Gold) करत असाल तर तज्ज्ञांचा अंदाज नेमका काय आहे, ते जाणून घ्या..

तज्ज्ञांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, नाताळपर्यंत सोन्याचा भाव (Gold Rate) 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम होणार आहे तर चांदीलाही लकाकी येणार आहे. चांदीचा दर (Silver Price) 70 हजार प्रति किलोग्रॅम होण्याची शक्यता आहे.

अमेरिकन मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्हने दिलेल्या संकेतानुसार, व्याजदरात आता मोठ्या प्रमाणात वृद्धी होण्याची शक्यता कमी आहे. डॉलर इंडेक्समध्ये घसरण सुरु आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीकडे मोर्चा वळविला आहे.

हे सुद्धा वाचा

पुढील महिन्यात फेडरल रिझर्व्हची बैठक होत आहे. त्यामध्ये व्याजदरात 75 बेसिस पॉईंट्स ऐवजी 35 ते 50 बेसिस पॉईंट्सची वृद्धी होण्याचा अंदाज आहे. महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न यशस्वी होत असल्याचा हा परिणाम असू शकतो.

या घडामोडींमुळे डॉलर निर्देशांक 103 अंकावर येईल. त्यानंतर तो घसरुन 100 वर येईल. त्यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्या-चांदीत गुंतवणुकीकडे ओढा वाढला आहे. त्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर होईल.

IIFL चे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या अंदाजानुसार नाताळमध्ये सोने आणि चांदीचे दर आगेकूच करतील. इंडेक्सन निर्देशांकामुळे सोन्याचे भाव 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम होणार आहे तर चांदीचा दर 70 हजार प्रति किलोग्रॅम होण्याची शक्यता आहे.

चांदीच्या भावाने 64 हजारांची पातळी ओलांडलीतर चांदीतील वृद्धी थोपविता येणार नाही. चांदी नाताळपर्यंत थेट 70 हजार रुपये प्रति किलो होऊ शकते. परिणामी गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होईल. तर सोन्यात 2500—3000 रुपये प्रति 10 ग्रॅमची कमाई साधता येईल.

गुरुवारी वायदे बाजारात (MCX) सोन्याचा दरात चांगली वृद्धी दिसून आली. सकाळी 10:30 वाजता प्रति 10 ग्रॅम 229 रुपयांची तेजी दिसून आली. सोने 52,680 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.

चांदीच्या किंमतीत सकाळी 10:30 वाजता 568 रुपये प्रति किलोग्रॅम वृद्धी दिसून आली. एक किलो चांदीसाठी वायदे बाजारात आज 62,460 रुपये हा उच्चांकी भाव मिळाला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.