AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : पुन्हा महागले सोने! पण चांदीचं करणार मालामाल

Gold Silver Price Today : चांदीच येत्या काही दिवसांत गुंतवणूकदारांना मालामाल करेल, असा तज्ज्ञांचा व्होरा आहे. आजचा सोन्या-चांदीचा भाव घ्या जाणून

Gold Silver Price Today : पुन्हा महागले सोने! पण चांदीचं करणार मालामाल
सोने-चांदीचा भाव काय
| Updated on: Apr 27, 2023 | 9:26 AM
Share

Gold Silver Price Today : सोन्याची आगेकूच सुरु आहे. पण वाढत्या किंमतींमुळे सोन्याने नाराजी ओढावून घेतली आहे. चांदी मात्र येत्या काही दिवसांत ग्राहकांना दमदार परतावा देणार आहे. 74200 रुपये प्रति किलोच्या घरात आहे. या आठवड्यात बुधवारी सोन्याच्या किंमती (Gold Price Update) 353 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाल्या. तर मंगळवारी सोन्याने स्वस्ताईची वर्दी दिली होती. 60078 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. तर बुधवारी चांदी महागली होती. चांदी 74200 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती. मंगळवारी चांदीच्या किंमती (Silver Price) स्वस्त झाल्या होत्या. यावर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात चांदीने 12 टक्के परतावा दिला होता. तर सोन्यातील गुंतवणुकीतून 8 टक्क्यांचा फायदा झाला होता.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव सराफा बाजारात 24 कॅरटचे सोने 353 रुपयांनी महाग होऊन 60431 रुपये, 23 कॅरेट सोने 352 रुपयांनी महाग होऊन 60189 रुपये, 22 कॅरेट सोने 324 रुपयांनी महाग होऊन 55355 रुपये, 18 कॅरेट सोने 264 रुपयांनी महागले आणि हा भाव 45323 रुपये झाला. 14 कॅरेट सोन्यात 206 रुपयांची वाढ होऊन हा भाव प्रति तोळा 35352 रुपयांवर पोहचला.

आज काय भाव गुडरिटर्न्सनुसार, 27 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 10 रुपयांची दरवाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,110 रुपये तर 24 कॅरेटचा भाव 10 रुपयांनी वधारुन 61,200 रुपये प्रति तोळ्यावर आला. सोन्याचा भाव कालपेक्षा जवळपास 100 रुपयांनी वधारला आहे.

चांदीची रॉकेट भरारी यावर्षी चांदी आणि सोन्याच्या किंमतींनी जवळपास 11 टक्क्यांची उसळी घेतली. पण सोन्याच्या वाढत्या भावामुळे ग्राहक, खरेदीदारांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे त्यांनी चांदीकडे मोर्चा वळविला आहे. चांदीत येत्या काही दिवसांत मोठी तेजी दिसू शकते. चांदीची मागणी वाढली आहे. चांदीच्या किंमती 9-12 महिन्यात वाढून 85,000 ते 90,000 रुपये प्रति किलोवर पोहचतील, असा अंदाज आहे. त्यामुळे चांदीच्या किंमतीत 20 टक्क्यांची तेजी दिसून येईल.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?