AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Loan: गुडन्यूज! गृहकर्ज होणार अजून स्वस्त; RBI ने क्रेडिट स्कोअर नियमात मोठा बदल

RBI ने फ्लोटिंग-रेट कर्ज नियमात मोठा बदल केला आहे. यामुळे क्रेडिट स्कोअर सुधारल्यानंतर ग्राहकांना लागलीच कमी व्याज दराचा फायदा मिळेल. आता त्यासाठी 3 वर्षे वाट पाहण्याची गरज नाही. यासाठी ग्राहकाला बँकेकडे विचारणा करावी लागेल.

Home Loan: गुडन्यूज! गृहकर्ज होणार अजून स्वस्त; RBI ने क्रेडिट स्कोअर नियमात मोठा बदल
गृहकर्ज अजून स्वस्त
| Updated on: Nov 28, 2025 | 10:08 AM
Share

RBI Home Loan Rule Change: जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याच्या विचारात असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता कर्ज हे अधिक स्वस्त मिळले. त्यासाठीचा व्याजदर कमी असेल. RBI ने फ्लोटिंग-रेट कर्ज नियमात मोठा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, क्रेडिट स्कोअर सुधारल्यानंतर ग्राहकांना लागलीच कमी व्याज दराचा फायदा मिळेल. आता त्यासाठी 3 वर्षे वाट पाहण्याची गरज नाही. यासाठी ग्राहकाला बँकेकडे विचारणा करावी लागेल. काय आहे हा नियम?

दोन प्रकारचा व्याज दर

बँका गृहकर्जावर दोन प्रकारे व्याजदर आकरतात. पहिला हा RBI रेपो रेट, T-Bill यील्ड सारखा असतो. तर दुसरा हा बेंचमार्क बँकेचा स्प्रेड असतो. स्प्रेड क्रेडिट रिस्क आणि कॉस्ट कव्हर करतो. नवीन नियमानुसार, स्प्रेडच्या नियमात काही बदल करण्यात आला आहे. म्हणजे जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर स्प्रेड कमी करून तुम्ही व्याजदर कमी करू शकता. यापूर्वी बँक 3 वर्षांत स्प्रेडचा आढावा घेत होत्या. नवीन मार्गदर्शक तत्वानुसार, आता हा लॉक इन पीरियड समाप्त करण्यात आला आहे. यामुळे क्रेडिट स्कोअर तर सुधारतोच. पण व्याजदर कपातीचा फायदा पण मिळतो.

असा कमी होईल स्प्रेड

या नियमाचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा क्रेडिट स्कोअर तपासावा लागेल. जर कर्ज घेतल्यानंतर तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारला असेल. तर लागलीच बँकेकडे जाऊन व्याज दरात कपात करण्याची मागणी करा. त्यासाठी अर्ज दाखल करा. त्यानंतर बँक क्रेडिटच्या आधारे तुमची मागणी योग्य आहे की नाही ते तपासेल आणि स्प्रेड कमी करेल. यामुळे व्याजदर कमी लागेल. अथवा बँक तुमचे बँकेचा कालावधी कमी करेल. दोन्ही बाबतीत तुमचा फायदा होईल.

साधारणपणे गृहकर्ज हे दीर्घ कालावधीसाठी देण्यात येतात. ज्याचे गृहकर्ज 50-60 लाखांपर्यंत असेल त्यांना मोठा फायदा होईल. जर तुमचे व्याजदर 0.25 टक्के जरी कमी झाले तरी महिन्याकाठी अनेक हजार वाचतील. हा पैसा जर तुम्ही म्युच्युअल फंडात टाकला तर दुसरीकडून तुमची काही वर्षानंतर मोठी कमाई होईल.

ग्राहकांना करावी लागेल विचारणा

RBI च्या इंट्रेस्ट रेट ऑन ॲडव्हान्स अंतर्गत ग्राहकांना बँकेकडे जाऊन व्याजदर कपातीविषयी विनंती करावी लागेल. नवीन ग्राहकांना रेट कटचा फायदा लागलीच मिळू शकतो. तर जुन्या ग्राहकांना स्प्रेड रिव्ह्यूसाठी तीन वर्षांच्या कालावधीची प्रतिक्षा करावी लागत होती. पण नवीन नियमामुळे आता सर्वांना समान संधी आहे. क्रेडिट स्कोर सुधारल्याचे लक्षात येताच ग्राहकांना लागलीच व्याजदर कपातीचा लाभ मिळेल.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.