AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदवार्ता! UPI पेमेंटवर रिवॉर्ड्सचा पाऊस, हे छोटं काम आणि कॅशबॅक हमखास

UPI Payments: युपीआय पेमेंटवर कॅशबॅक आणि रिवॉर्डसाठी काही ट्रिक फॉलो केल्यास तुम्हाला चांगला फायदा होतो. काही ॲप्स थोड्या दिवसासाठी कॅशबॅक, रिवॉर्ड्स देतात. तज्ज्ञांच्या मते, काही व्यवहारावरच चांगला फायदा होतो. तो फायदा असा ओळखा?

आनंदवार्ता! UPI पेमेंटवर रिवॉर्ड्सचा पाऊस, हे छोटं काम आणि कॅशबॅक हमखास
युपीआय पेमेंट्स कॅशबॅक
| Updated on: Nov 28, 2025 | 8:46 AM
Share

UPI Payments Rewards: UPI ॲप्स आता कॅशबॅक आणि पॉईंट्सवर अधिक भर देत आहेत. काही ॲप्स ऑफर्स पण देत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यवहारावर कसा तुमचा अधिक फायदा होईल, यावर काही ॲप्स काम करत आहेत. रिवॉर्ड्स मिळण्यासाठी आणि कॅशबॅक मिळण्यासाठी कोणता व्यवहार करावा? कोणत्या व्यवहारावर अधिक फायदा मिळतो? हे तज्ज्ञांकडून समजून घेऊयात. काही ॲप्स थोड्या दिवसासाठी कॅशबॅक, रिवॉर्ड्स देतात. तज्ज्ञांच्या मते, काही व्यवहारावरच चांगला फायदा होतो. तो फायदा असा ओळखा?

LIGHT – Credit for UPI चे CEO आणि सह संस्थापक विधी भट्ट यांच्या मते ॲप्स 1-2% कॅशबॅक असा आकड्यांचा खेळ खेळतात. पण या मागे कॉईन अथवा पॉईंट यांचे महत्त्व अधिक आहे. काही प्लॅटफॉर्म 1 कॉइन = ₹1 असा फायदा देतात. तर काही एका कॉईनसाठी 40 पैसे देतात. त्यामुळे तुमच्याकडील असलेल्या ॲप्समध्ये प्रत्येक व्यवहारानंतर किती पॉईंट्स, किती टक्के कॅशबॅक मिळतो याकडे बारकाईने लक्ष ठेवा. दिवसभरतील व्यवहारांवर संध्याकाळी एक नजर टाका आणि त्यातून काय फायदा झाला ते पाहा. हे काम पाच ते दहा मिनिटांचे आहे. त्यामुळे तुम्हाला फायद्याचे गणित समजेल.

कोणत्या श्रेणीत अधिक रिवॉर्ड्स?

विधी भट्ट यांच्या मते, सर्वच व्यवहारांवर एक सारखे रिवॉर्ड्स मिळत नाहीत. ट्रॅव्हल,शॉपिंग,डायनिंग आणि सिनेमा सारख्या कॅटेगिरीत सर्वाधिक फायदा मिळतो. कारण यामध्ये ॲप्ससोबत ब्रँड पार्टनरशिप आणि प्रमोशन असते. अनेकदा ॲप्स सब्सक्रिप्शन, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि फूड डिलिव्हरीवर चांगले रिवॉर्ड्स देतात. तर बिल पेमेंट आणि रिचार्ज सारख्या खर्चावर कमी रिवॉर्ड्स मिळतात. ज्यांना अधिक फायदा हवा, त्यांनी या खर्चानुसार ॲप्सचा वापर करणे फायद्याचे ठरते. केवळ एकाच ॲप्सवरून फायदा होत नाही.

रिवॉर्ड्ससाठी धोका स्वीकारु नका

भट्ट यांच्या मते काही जण रिवॉर्ड्स आणि कॅशबॅकच्या चक्करमध्ये कोणतेही ॲप्स डाऊनलोड करतात. त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे रिवॉर्ड्स फीचर्स योग्य आणि चांगल्या प्लॅटफॉर्मची चाचपणी केल्यानंतरच मिळवा. त्यासाठी युझर्सने विश्वसनीय ॲप्स डाऊनलोड करावे. त्यासाठी परमिशन देतानाही विचार करावा. जे ॲप्स ऑफर्स अथवा रिवॉर्ड्ससाठी मॅसेज अथवा पर्सनल फाईल्स सारखी माहिती मागत असेल त्यांच्यापासून सावध राहायला हवे. UPI PIN गोपनिय ठेवावा. फोनमधील सिक्युरिटी ऑन ठेवा. तर काही ॲप्स अपडेट ठेवणे आवश्यक आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.