तुपापासून ते लोण्यापर्यंत आणि AC-TV, फ्रिजपर्यंत…GST मधून सूटका, 175 वस्तू अवाक्यात येणार, स्वस्ताईचे युग येणार
GST Council Meeting : ग्राहकांसाठी मोठी आनंदवार्ता येऊन धडकणार आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदींनी जीएसटी रिफॉर्मची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच स्वस्ताईचे युग येणार आहे.

जीएसटी परिषदेची 56 वी बैठक आजपासून सुरू झाली आहे. उद्या या बैठकीनंतर निर्णयांचा पाऊस पडेल. सर्वसामान्यांपासून ते कंपन्यांपर्यंत त्याची प्रतिक्षा आहे. कारण 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून एक मोठी घोषणा केली होती. त्यांनी दिवाळीत नवीन जीएसटी रिफॉर्मची, सुधारणा जाहीर केली होती. या घोषणेनंतर जीएसटी परिषदेची ही पहिली बैठक आहे.
जीएसटी परिषदेच्या या बैठकीत अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. तर दिवाळीत वस्तू आणि सेवा करातील सुधारणेतंर्गत दोन स्लॅबवर निर्णय होऊ शकतो. सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरातील अनेक वस्तू स्वस्त करण्याावर शिक्कामोर्तब होऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या दोन दिवसीय बैठकीत उपस्थित आहेत. यामध्ये दैनंदिन उपयोगातील वस्तूंसोबतच महागड्या वस्तूंची किंमत सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे.
2 स्लॅबवर होईल चर्चा
केंद्राच्या प्रस्तावानुसार, आता केवळ दोन जीएसटी स्लॅब असतील. यामध्ये 28 टक्क्यांचा एक स्लॅब. यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू, शारीरिक हानी पोहचवणाऱ्या वस्तू सोडून, 18 टक्के स्लॅबमध्ये असतील. तर 12 टक्के स्लॅबमधील वस्तू या 5 टक्क्यांच्या स्लॅबअंतर्गत येतील. 40 टक्क्यांचा अजून एक स्लॅब असेल. यामध्ये 6-7 वस्तू असतील. आलिशान आणि हानीकारक वस्तूंचा त्यात समावेश असू शकतो.
स्वस्ताईचे युग
मनीकंट्रोलच्या एका वृत्तानुसार, जवळपास 175 वस्तूंवरील जीएसटी कपात शक्य आहे. यामध्ये खाद्य पदार्थ, बादाम, स्नॅक्स, रेडी-टू-ईट वस्तू, तूप, लोणी, लोणचं, मुरब्बा, चटणी, ऑटोमोबाईल, ट्रॅक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, एसी, रेफ्रिजरेटर या वस्तूंचा यामध्ये समावेश होऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, जर मंत्रिगट, दर कपातीचा प्रस्ताव मांडेल आणि तो जर जीएसटी परिषदेने स्वीकारला तर सर्व वस्तूंवरील जीएसटी हा सर्वसाधारणपणे जवळपास 11.5 टक्क्यांहून घसरून 10 टक्क्यांवर येईल. त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होतील. सध्या चाकरमान्यांवर महागाईचा मोठा मारा आहे. खासगी क्षेत्रातील कामगार कर भरून भरून थकला आहे. त्याचा आवाज या देशात ऐकणार की नाही अशी ओरड तज्ज्ञ सुद्धा करत होते.
12-28 टक्के स्लॅबमधील काही वस्तू
- तूप
- लोणी
- चीज
- पॅक्ड फ्रोजन भाजीपाला
- फ्रूट ज्यूस
- छत्री
- सोलर वॉटर हीटर
- कृषी उपकरणं
- एअर कंडिशनर
- सीमेंट
- कार/एसयुव्ही
