Multibagger Stock : या शेअरची जोरदार मुसंडी, क्रिकेटर रोहित शर्मांनी छापल्या नोटा, आठवडाभरातच गुंतवणूकदार मालामाल
Multibagger Stock : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा क्रिकेटच्या ग्राऊंडवर तर जबरदस्त खेळी करतच आहे. पण तो शेअर बाजारातही दमदार कामगिरी करत आहे. त्याने या शेअरमधून जोरदार कमाई केली.

शेअर बाजारात चांगल्या परताव्यासाठी सामान्य गुंतवणूकदार ते सेलिब्रिटीजपर्यंत प्रत्येक जण गुंतवणूक करतो. यामध्ये टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा (Cricketer Rohit Sharma Investment) याने एका मल्टिबॅगर शेअरच्या माध्यमातून जबरदस्त कमाई केली आहे. योग्य वेळी शेअर विक्री करून तो बाहेर पडला. दिल्लीतील आयटी सेवा पुरवठादार कंपनी रिलायबल डेटा सर्व्हिसेजमधील 0.5% वाटा त्याने विकला. एक्सचेंजेसवरील ब्लॅक डीलवरील आकडेवारीनुसार, रोहित शर्माने कंपनीचे 53,200 शेअर 163.91 रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर विक्री केले. त्याचे मूल्य 87.2 लाख रुपये इतके होते.
डिसेंबर 2023 मधील शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, रोहित शर्माकडे रिलायबल डेटा सर्व्हिसेजमध्ये 1,03,200 शेयर (1 टक्के वाटा) होता. मार्च 2024 मध्ये शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, त्यांचे नाव भागधारकांच्या यादीतून हटले. विशेष म्हणजे या शेअरने गेल्या आठवड्यात 70 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला. हा शेअर तुफान पळाला. गुंतवणूकदारांना हा शेअर इतका धावेल असे वाटत नव्हते. सध्या टॅरिफ वॉरमुळे अनेक कंपन्या चिंताग्रस्त असताना या कंपनीने जबरदस्त कामगिरी बजावली.
रिलायबल डेटा सर्व्हिसेजच्या शेअरमध्ये तुफान
रिलायबल डेटा सर्व्हिसेजच्या शेअर्समध्ये सातत्याने गेल्या आठवड्यात तेजीचे सत्र दिसून आले. वास्ताविक, 1 सप्टेंबर रोजी कंपनीच्या शेअरमध्ये घसरण आली. हा शेअर 155.71 रुपयांवर ट्रेड, व्यापार करत होता. 2 ऑगस्ट रोजी रिलायबल डेटा सर्व्हिसेजचा शेअर 10 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. केवळ 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सनी मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. या काळात रिलायबल डेटा सर्व्हिसेजचे शेअर 115 टक्क्यांनी वधारले. तर गेल्या 5 वर्षांत शेअर्समध्ये 440 टक्क्यांहून अधिकचा परतावा मिळाला आहे.
रोहित शर्मा मालामाल
रिलायबल डेटा सर्व्हिसेजमधील 0.5% वाटा रोहित शर्मा याने अगोदरच विक्री केला. स्टॉक एक्सचेंजेसवरील ब्लॅक डीलवरील आकडेवारीनुसार, रोहित शर्माने या कंपनीचे 53,200 शेअर 163.91 रुपये प्रति शेअर भावाने विक्री केले. त्याचे मूल्य 87.2 लाख रुपये इतके होते. या विक्रीतून त्याला चांगली कमाई झाली. त्याने ही विक्री का केली हे समोर आले नाही. पण त्याला त्यातून कमाई करता आली.
डिस्क्लेमर : हा शेअरच केवळ लेखाजोखा आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तज्ज्ञाचे मार्गदर्शन जरूर घ्या. लाभ अथवा नुकसानीला टीव्ही 9 जबाबदार नसेल.
