Gujarat Pipavav Share | हा शेअर सध्या 100 पेक्षा कमी किंमतीत, लवकरच घेईल भरारी, फायद्याचे हे गणित समजून घेतले का?

Gujarat Pipavav Share | 100 रुपयांपेक्षा ही कमी किंमतीत मिळत असलेल्या या शेअरची माहिती करुन घ्या. तज्ज्ञांच्या मते हा शेअर तुम्हाला वर्षभरात 51 टक्क्यांचा फायदा मिळवून देऊ शकतो.

Gujarat Pipavav Share | हा शेअर सध्या 100 पेक्षा कमी किंमतीत, लवकरच घेईल भरारी, फायद्याचे हे गणित समजून घेतले का?
हा शेअर करेल मालामालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 7:00 AM

Gujarat Pipavav Share | परदेशी बाजारातील (Foreign Market) अस्थिरतेचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारांवरही (Share Market) दिसून येत आहे. सध्या अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल, प्रगतीचा आलेख समोर येत आहे. त्यात अनेक कंपन्यांची परिस्थिती विपरीत असतानाही चांगली घौडदौड झाली आहे. तर काहींची कामगिरी करताना दमछाक झाली आहे. काही टॉप शेअर्स (Top Shares) व्यावासायिक गणित साधण्यात यशस्वी ठरले नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर बाजारातील तज्ज्ञ गुंतवणूकदारांना (Investors) गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत. अनेक स्टॉक्सविषयी सध्या बाजारात माहिती देण्यात येत आहे. चांगल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी याविषयीची माहिती समोर येत आहे. ब्रोकरेज हाऊस अशाच गुजरात पिपावाव पोर्ट लिमिटेड (Gujarat Pipavav Port Ltd) या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत. कंपनीच्या तिमाही निकालाचे आकडे चांगले असून भविष्यात कंपनी अधिक प्रगती साधण्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. 100 रुपयांच्या आत मिळत असणारा हा शेअर लवकरच लांब उडी मारेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बोलके तिमाहीचे आकडे

कंपनीने अलीकडेच एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ब्रोकरेज हाऊस एडलवाईज सिक्युरिटीजने (Edelweiss Securities) 100 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या हा इन्फ्रा स्टॉक (Infra Stocks) खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसनुसार, कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगला नफा कमवला आहे. गुजरात पिपावावचा स्टॉक 4 ऑगस्ट 2022 रोजी रु.80.85 वर बंद झाला.

हे सुद्धा वाचा

Gujarat Pipavav:

ब्रोकरेज रिसर्च फर्म एडलवाईस सिक्युरिटीने पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपनी गुजरात पीपी पॉवर पोर्टचा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. 3 ऑगस्ट रोजी या शेअरची किंमत 81 रुपये होती. ब्रोकरेज हाऊसने या शेअरचे निर्धारीत लक्ष्य 122 रुपये ठेवले आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीपेक्षा 51 टक्के मजबूत परतावा मिळू शकतो. पण गेल्या एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना निराश केले आहे. या शेअर्सने गुंतवणूकदारांच्या 24 टक्के रक्कमेचं नुकसान केले आहे.

ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की गुजरात पिपावाव पोर्ट (GPVL) चा निव्वळ नफा अंदाजापेक्षा 15 टक्के जास्त आहे. कंटेनर कार्गो व्हॉल्यूममध्ये अपेक्षेपेक्षा जास्तीचा परिणाम कंपनीच्या निव्वळ नफ्यावर दिसून आला. जागतिक कंटेनर बाजार सुधारत आहे. कंपनी व्यवस्थापनाला दोन्ही विभागांमध्ये व्हॉल्यूम अधिक चांगले राहण्याची अपेक्षा आहे. याशिवाय कृषी मालाच्या निर्यातीमुळे बल्क कार्गोला चालना मिळेल. त्यामुळे या कंपनीला येत्या काही दिवसात चांगला फायदा होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

विशेष सल्ला | हा केवळ एक सल्ला असून गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.