Pharma Industry : किफायतशीर दरात चांगल्या गुणवत्तेची औषधं, 20 वर्षीय युवकाची उद्योगभरारी, फार्मा उद्योगात अनोखं उदाहरण

अर्जुन देशपांडे याने अवघ्या 16 व्या वर्षी सुरू केलेल्या जनरिक आधार या कंपनीने थेट उत्पादकांशी भागीदारी केली. विशेष म्हणजे फ्रँचाईज स्टोर्सच्या माध्यमातून ग्राहकांना किफायतशीर दरात औषधे दिले आहेत.

Pharma Industry : किफायतशीर दरात चांगल्या गुणवत्तेची औषधं, 20 वर्षीय युवकाची उद्योगभरारी, फार्मा उद्योगात अनोखं उदाहरण
20 वर्षीय युवकाची उद्योगात झेपImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 2:55 PM

मुंबई : जनरिक आधार (Generic Aadhaar) या फार्मास्युटिकल स्टार्टअपचा संस्थापक आणि CEO वीस वर्षीय अर्जुन देशपांडे (Arjun Deshpande) यांनी डीप टेक आणि हेल्थकेअर (Health Care) क्षेत्रातील आघाडीची जपानी व्हेंचर कॅपिटल फर्म बियॉण्ड नेक्स्ट व्हेंचर्सकडून एका अज्ञात रकमेचे प्री-सिरीज A फंडिंग उभारल्याचं जाहीर केलंय. या सौद्यामुळे त्याच्या कंपनीचे मूल्यांकन 500 कोटी रु. वर पोहोचले. अर्जुन देशपांडे याने अवघ्या 16 व्या वर्षी सुरू केलेल्या जनरिक आधार या कंपनीने थेट उत्पादकांशी भागीदारी करून आपल्या फ्रँचाईज स्टोर्सच्या माध्यमातून ग्राहकांना किफायतशीर दरात चांगल्या गुणवत्तेची औषधे प्रदान करून फार्मा उद्योगात क्रांती घडवून आणली आहे. जनरिक आधारमध्ये करण्यात आलेली ही पहिली संस्थात्मक गुंतवणूक आहे. या आधी टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी एक एंजल इन्व्हेस्टर म्हणून एक अज्ञात रक्कम या कंपनीत गुंतवली होती. या नवीन भांडवलाचा उपयोग जनरिक आधारच्या फ्रँचाईज स्टोर्सची संख्या 1500 वरून 3000 वर घेऊन जाण्यासाठी, डिजिटायझेशनचे लक्ष्यांक साध्य करण्यासाठी आणि त्यांच्याद्वारे ऑफर करण्यात येणार्‍या औषध उत्पादनांची श्रेणी विस्तृत करण्यासाठी करण्यात येईल.

वर्तमान घडामोडीविषयी टिप्पणी करताना जनरिक आधारचा संस्थापक आणि CEO अर्जुन देशपांडे म्हणाले, “आपल्या देशातील 130 कोटी लोकांना औषधे स्वस्तात उपलब्ध करून देऊन भारतीय हेल्थकेर ईकोसिस्टममध्ये क्रांती घडवून आणणारी संस्था म्हणून जनरिक आधार ही कंपनी विकसित करणे हेच माझे लक्ष्य आहे. जनरिक आधार ही काही कॅश बर्निंग कंपनी नाही, तर एक नफा करणारी कंपनी आहे, त्यामुळे ही फेरी उभारण्याचे आम्ही ठरवले आणि त्याला VC समुदायाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. मला आनंद वाटतो की, बियॉण्ड नेक्स्ट व्हेंचर्समधील श्री. सुयोशी इटो आणि त्यांच्या टीमने या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी भागीदारी केली आणि माझे स्वप्न साकारण्यास हातभार लावला. या फंडचा विनियोग येत्या 8 महिन्यात करण्याचा आमचा मानस आहे आणि यातून कंपनी झपाट्याने वाढेल आणि देशभरातील शहरे, टियर 2 आणि टियर 3 शहरांतील औषधांची उणीव भरून काढता येईल. देशभरातील आमच्या ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद पाहता, येत्या 8 ते 12 महिन्यांत आम्ही सिरीज A फेरी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”

सदर फंडिंगबद्दल बियॉण्ड नेक्स्ट व्हेंचर्सचे CEO श्री. सुयोशी इटो म्हणाले, “एक गुंतवणूकदार म्हणून जनरिक आधारशी हातमिळवणी करताना बियॉण्ड नेक्स्ट व्हेंचर्समध्ये आम्हाला खूप आनंद होत आहे. अर्जुन देशपांडे या धडाडीच्या तरुणाने हे एक नावीन्यपूर्ण बिझनेस मॉडेल उभे केले आहे, ज्याने भारतातील फर्मास्युटिकल उद्योगात क्रांती घडवून आणली आहे. श्री. रतन टाटा यांचा अर्जुनला पाठिंबा आहे, ही वस्तुस्थितीच या कंपनीच्या आणि संस्थापकाच्या विश्वासार्हतेबद्दल आणि क्षमतेविषयी बरेच काही सांगणारी आहे. जनरिक आधारमध्ये आम्ही केलेली गुंतवणूक भारतातील विकास क्षेत्राला मदत करण्याच्या आमच्या तत्वज्ञानाशी अनुरूपच आहे.”

अर्जुन 16 वर्षांचा होता, तेव्हा त्याने एका म्हातार्‍या गृहस्थाला आपल्या कॅन्सर पीडित पत्नीसाठी उधारीवर औषध देण्यासाठी एका औषधांच्या दुकानात गयावया करताना पाहिले, त्यावेळी त्याची ही वाटचाल सुरू झाली. आपल्या पत्नीसाठी महागडी औषधे विकत घेण्याची त्या गृहस्थाची ऐपत नव्हती म्हणून तो उधारीवर औषधे मागत होता. त्या गरीब म्हातार्‍याची ती दयनीय परिस्थिती पाहून अर्जुनने आपल्याकडून या समस्येवर तोडगा शोधण्याचा निर्धार केला आणि त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या एकमेव उद्देशाने जनरिक आधारचा प्रवास सुरू झाला.

अर्जुनच्या हे ध्यानात आले की, सुमारे 60% भारतीयांना त्यांची दैनंदिन औषधे परवडत नाहीत, कारण फार्मा ब्रॅंडकडून जनरिक औषधे विकत घेण्यासाठी त्यांना अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. यातून अर्जुनला जनरिक आधार या अशा एका स्टोअरची कल्पना सुचली, की जे B2B आणि B2C फ्रँचाईज-मॉडेलवर आधारित असून विविध फार्मास्युटिकल स्टोअर्सशी हातमिळवणी करून अनुदानित किंमतीत औषधे विकेल. ग्राहकांना या औषधांवर सुमारे 80% सवलत मिळू शकते आणि ही औषधे WHO-GMP सुविधांमधून आलेली असतात.

सिंगल मेडिकल स्टोअर्स आणि रिटेलर्स यांच्याशी टाय-अपच्या रूपात जनरिक आधार देशातील 150 शहरांमध्ये उपलब्ध आहे. हे फार्मसी अॅग्रीगेटर मॉडेल ब्रॅण्ड्सकडून नाही, तर उत्पादकांकडून औषधे मिळवते व रिटेलर्सकडे पोहोचवते. यामुळे मध्यस्थांची गरज उरत नाही व त्यामुळे औषधाची किंमत कमी होते. या फ्रँचाईज मॉडेलमार्फत जनरिक आधार रोजगार निर्मितीबरोबरच अनेक मायक्रो उद्यमी देखील तयार करत आहे. या कंपनीने देशभरात 1500+ मायक्रो उद्यमी तसेच 8000+ प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रोजगाराच्या शक्यता निर्माण केल्या आहेत.

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.