
आयुष्यात भरपूर पैसे कमवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी आपण सर्वजण कष्ट करत असतो. तुम्हाला वाटत असेल की श्रीमंत लोक पैसे कमवण्यासाठी मोठी जोखीम घेतात. मात्र हे चुकीचे आहे. श्रीमंत लोक हे मोठी जोखीम न घेता चक्रवाढ व्याजातून आणखी पैसे कमवत असतात. याला आर्थिक भाषेत रूल ऑफ 72 म्हणतात. या नियमाच्या आधारे तुम्ही तुम्ही गुंतवलेली रक्कम किती वर्षांमध्ये दुप्पट होऊ शकते याची माहिती मिळते. याबाबत सविस्तस माहिती जाणून घेऊयात.
चक्रवाढ व्याज हे पैसे कमावण्याचे महत्त्वाचे साधन आहे. कारण या प्रकारात केवळ तुम्ही गुंतवलेल्या पैशावरच नाही तर त्यावर मिळत असलेल्या व्याजावर देखील व्याज मिळते. सुरुवातीला तुमचे पैसे हळूहळू वाढतात, मात्र काही वर्षांनंतर त्यात झपाट्याने वाढ होते. रूल ऑफ 72 नेमका काय आहे? याचा काय फायदा होतो? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
सूत्र – 72 ÷ वार्षिक परतावा (%) = तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी लागणाऱ्या वर्षांची संख्या
हे उदाहरणाद्वारे समजून घेऊयात, जर तुम्हाला गुंतवणूकीवर 8 % वार्षिक परतावा मिळवत असेल, तर तुमचे पैसे अंदाजे 9 वर्षांत दुप्पट होतील.
रूल ऑफ 72 नियमात असे गृहीत धरले जाते की, दरवर्षी चक्रवाढ व्याजाद्वारे परतावा मिळतो. बाजारात चढउतार असेल किंवा इतर काहीही कारण असो, तुम्हाला सरासरी व्याजदर समजला तर या नियमाद्वारे तुम्ही किती वर्षात पैसे दुप्पट होतील हे जाणून घेऊ शकता. तुम्हाला व्याजदरातील 1-2% हा फरक छोटा वाटू शकतो, मात्र दीर्घ काळावधीसाठी गुंतवणूक केल्यास तुम्ही झपाट्याने चांगला पैसा मिळवू शकतो.
रूल ऑफ 72 नियम ही केवळ आकडेमोड नाही. यातून समजते की किती व्याजदर मिळतो यापेक्षा किती वेळ तुमचा पैसा मार्केटमध्ये आहे यातून तुम्हाला परतावा मिळते. जे लोक जास्त वेळ बाजारात पैसे गुंतवून ठेवतात, त्यांना नक्कीच जास्त परतावा मिळतो. त्यामुळे तुम्हाही जर चक्रवाढ व्याजदराने पैसे कमवण्याचा विचार करत असाल तुम्हालाही संयम ठेवावा लागेल.