
दिल्ली मेट्रोचे तिकीट आता व्हॉट्सअॅपवरून थेट बुक करता येते. या सोयीमुळे तुम्हाला लांब रांगेत थांबावे लागणार नाही. मेट्रो स्टेशनवर वेळही वाया जाणार नाही. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवा आणि काही मिनिटांत तिकीट तयार! चला, याचा सोपा मार्ग जाणून घेऊया.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने प्रवाशांच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅपवर तिकीट बुकिंगची सुविधा सुरू केली आहे. आता तिकीट घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुमच्या स्मार्टफोनवर काही मिनिटांत तिकीट बुक होऊ शकते. हा मार्ग कसा आहे, ते पाहूया
DMRC ने तिकीट बुकिंगसाठी अधिकृत व्हॉट्सअॅप नंबर +91 9650855800 जारी केला आहे. हा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा आणि व्हॉट्सअॅपवरून तिकीट बुक करा.
1. व्हॉट्सअॅपवर +91 9650855800 या नंबरवर ‘Hi’ पाठवा.
2. स्वयंचलित मेसेजद्वारे बुकिंग प्रक्रिया सुरू होईल.
3. तुमच्या प्रवासाचे सुरुवातीचे आणि शेवटचे स्टेशन निवडा.
4. सिंगल किंवा रिटर्न तिकीट हवे ते ठरवा.
5. पेमेंट लिंक येईल. UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करा.
6. पेमेंट झाल्यावर व्हॉट्सअॅपवर QR कोड असलेले तिकीट मिळेल.
7. मेट्रो स्टेशनवर हा QR कोड स्कॅन करून प्रवेश मिळवा.
WhatsApp वरून दिल्ली मेट्रोची तिकीट काढताना हे गोष्टी नक्की लक्षात ठेवा:
1. तिकीट बुक करण्यासाठी फक्त दिल्ली मेट्रोच्या अधिकृत WhatsApp नंबरचा वापर करा. फसवणूक टाळण्यासाठी अविश्वसनीय नंबरपासून दूर रहा.
2. आपले आधार कार्ड, कार्ड डिटेल्स किंवा इतर संवेदनशील माहिती फक्त सुरक्षित आणि अधिकृत वेबसाईट किंवा अॅपवरच द्या.
3. तिकीट बुकिंग नंतर लगेच पुष्टी आणि टिकीटचा ई-मेल किंवा मेसेज मिळाला की त्याची खात्री करा.
4. तिकीट मिळाल्यावर QR कोड सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा, तो प्रवासादरम्यान आवश्यक पडतो.
5. WhatsApp अॅप आणि फोनला अपडेट ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून तिकीट बुकिंग प्रक्रिया सुरळीत होईल.