IDFC फर्स्ट बँककडून ‘घर घर राशन’ योजना, ग्राहकांना रेशन खरेदीसाठी 1800 रुपये देणार

| Updated on: Jun 13, 2021 | 4:57 PM

मुंबई : कोरोना काळात कर्मचाऱ्यांना मदत व्हावी म्हणून अनेक कंपन्या समोर येत आहेत. त्यातच आता खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँकेनेही (IDFC First Bank) पुढाकार घेतलाय. बँक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निधीतून बँकेने आपल्या कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी ‘घर घर राशन’ (Ghar Ghar Ration) योजना सुरु करण्याची घोषणा केलीय. या योजनेमुळे कोरोना काळात ज्यांच्यावर आर्थिक संकट आलंय अशा […]

IDFC फर्स्ट बँककडून ‘घर घर राशन’ योजना, ग्राहकांना रेशन खरेदीसाठी 1800 रुपये देणार
Follow us on

मुंबई : कोरोना काळात कर्मचाऱ्यांना मदत व्हावी म्हणून अनेक कंपन्या समोर येत आहेत. त्यातच आता खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँकेनेही (IDFC First Bank) पुढाकार घेतलाय. बँक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निधीतून बँकेने आपल्या कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी ‘घर घर राशन’ (Ghar Ghar Ration) योजना सुरु करण्याची घोषणा केलीय. या योजनेमुळे कोरोना काळात ज्यांच्यावर आर्थिक संकट आलंय अशा आयडीएफसी बँक ग्राहकांना मदत होणार आहे (IDFC First Bank started Ghar Ghar Ration scheme amid Corona lockdown).

बँकने ट्विट करत माहिती दिली, ‘घर घर राशन’ उपक्रम IDFC फर्स्ट बँकेचा एक अभिनव उपक्रम आहे. यात बँकेचे कर्मचारी या संकटाच्या काळात गरजूवंतांना आपल्या व्यक्तीगत उत्पन्नातून काही योगदान देणार आहेत. ग्राहक सर्वात आधी या ब्रिदवाक्यावर चालणारी बँक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही ग्राहकांना शक्य ती मदत करत आहोत.”

बँकेने कोरोना साथीरोगाच्या (COVID-19) सुरुवातीपासून मदतकार्य सुरू केलंय. कोरोनामुळे जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी एक ‘कॉम्प्रिहेंसिव एम्प्लॉई कोविड केअर स्कीम 2021’ (Employee COVID Care Scheme 2021) सुरु करण्यात आली.

‘घर घर राशन’ उपक्रमाची वैशिष्ट्ये

  • या उपक्रमात कोरोनामुळे संकटात सापडलेल्या आणि 50,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या बँक ग्राहकांना रेशन किट देण्यात येणार आहे.
  • रेशन किटमध्ये एक महिना पुरेल इतकं साहित्य असेल. यात 10 किलो तांदुळ/पीठ, 2 किलो दाळ, 1 किलो साख आणि मिठ, 1 किलो खाद्य तेल, मसाल्यांचे 5 पॅकेट, चहा पावडर, बिस्किट आणि इतर आवश्यक वस्तू असतील.
  • ग्रामीण भागात बँक कर्मचारी स्वतः रेशन किट वितरित करणार आहेत. शहरी भागात कोरोना प्रभावित ग्राहकांना 1,800 रुपयांचे प्री-पेड कार्ड्स देण्यात येणार आहेत. त्याचा वापर घरगुती वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी होणार आहे.
  • या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणात 1000 रेशन किट आधीच वितरित करण्यात आल्यात.
  • यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी एका दिवसापासून एक महिन्यापर्यंतचं वेतन दिलंय.

हेही वाचा :

जूनअखेर ‘ही’ महत्त्वाची काम तातडीने निपटा, अन्यथा मोठं नुकसान निश्चित

’55 लाख रुपये द्या, अन्यथा बँक उडवून देईन’, वर्ध्यात सुसाईड बॉम्बरची धमकी देऊन पैशांची मागणी

PHOTO | ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना, लवकरच ‘या’ दोन सरकारी बँकाचे होणार खासगीकरण

व्हिडीओ पाहा :

IDFC First Bank started Ghar Ghar Ration scheme amid Corona lockdown