Income Tax Return : ITR भरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! नाही तर करदात्यांना 5000 रुपयांचा दणका

Income Tax Return : 31 जुलै तारीख अत्यंत जवळ आली आहे. ITR भरण्यासाठी एकच गर्दी उसळते. त्यामुळे आयकर विभागाच्या वेबसाईटवर ट्रॅफिक वाढते. करदाते, व्यावसायिक आणि कंपन्यांसाठी वेगवेगळे आयटीआर फॉर्म असतात.

Income Tax Return : ITR भरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! नाही तर करदात्यांना 5000 रुपयांचा दणका
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 8:47 AM

नवी दिल्ली : प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. कराचा भरणा करण्यासाठी करदात्यांकडे आता फार कालावधी उरलेला नाही. अंतिम मुदतीच्या आता करदात्यांनी कराचा भरणा केला नाही तर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 31 जुलै आयटीआर भरण्याची अंतिम मुदत आहे. काहीजण प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरताना उशीर करतात. 31 जुलैपर्यंत करदाते आर्थिक वर्ष 2022-23 चे रिटर्न भरू शकतात. कर भरणा करण्यास उशीर झाल्यास आयकर विभागाची नोटीस येईल. तुम्हाला कर तर भरावा लागतो, पण दंडाचा (Penalty) फटका पण सहन करावा लागतो.

हलगर्जीपणा टाळा कराचा भरणा करताना करदात्यांना हलगर्जीपणा नडू शकतो. करदात्यांनी अंतिम तारखेची वाट पाहू नये. तातडीने कर भरणा करावा. प्राप्तिकर विभागाने याविषयी सातत्याने आवाहन केले आहे. देय तारखेपर्यंत आयकर विवरणपत्र न भरल्यास तुम्हाला दंडाचा भरणा करावा लागू शकतो.

अंतिम मुदतीची नका पाहू वाट करदात्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता तातडीने कर भरणा करण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने (ITD) केले आहे. देय तारीख निघून गेल्यास करदात्यांना आर्थिक फटका बसेल. त्यांना वेळेत आयकर विवरणपत्र न भरल्याने दंड भरावा लागेल. आयकर विभागाची नोटीस येईल. म्हणजे कर तर भरावाच लागेल पण दंडाचा भूर्दंड पण सहन करावा लागेल.

हे सुद्धा वाचा

5000 रुपयांचा दंड मुदतीच्या आता आयटीआर न भरल्यास दंड भरावा लागेल. आयकर विभागाच्या माहितीनुसार 31 जुलै 2023 रोजीनंतर आयटीआर दाखल केल्यास 5,000 रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागेल. त्यानंतर दंडासहित कर भरण्याची अंतिम मुदत उलटून गेल्यानंतरही कर भरणा केला नाही तर दुप्पट दंड भरावा लागेल.

फायदा काय इन्कम टॅक्स रिटर्न वेळेत भरल्यास त्याचा फायदा मिळेल. बँकेकडून कर्ज घेणे, टीडीएस क्लेम करणे, क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे किंवा व्हिसा अर्जाची प्रक्रिया करताना कर भरणा केलेला असेल तर ही प्रक्रिया तुमच्यासाठी सोपी होईल. उत्पन्नाचा आणि ओळखीचा पुरावा म्हणूनही तुम्हाला त्याचा वापर करता येईल.

एकूण सात प्रकारचे अर्ज आर्थिक वर्ष 2022-23 साठी 31 जुलैपर्यंत तुम्ही प्राप्तिकर रिटर्न (ITR) दाखल करु शकता. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (CBDT) एप्रिल महिन्यात ITR फॉर्म जारी करण्यात आले. नोकरदार वर्गासाठी कंपन्यांकडून फॉर्म-16 जारी देण्यात आले. त्यामुळे आता आयटीआर फाईल करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. 31 जुलैपर्यंत प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावरील ट्रॅफिक जाम होते. त्यामुळे वेळेच्या आत आयटीआर फाईल करा. वैयक्तिक करदाता, व्यावसायिक आणि कंपन्यांसाठी सात प्रकारचे ITR फॉर्म आहेत.

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.