AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITR Filing : इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरायचा? उशीर झाला तर किती दंड? जाणून घ्या ITR बद्दल सर्वकाही..

Income Tax Return Filing : इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयकर परतावा. या फॉर्मद्वारे तुम्ही सरकारच्या आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाविषयी माहिती देता. गेल्या आर्थिक वर्षामध्ये आपण किती कमावलं, त्यासाठी किती टॅक्स भरला, याचा दाखला इन्कम टॅक्स रिटर्नद्वारे देतो.

ITR Filing : इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरायचा? उशीर झाला तर किती दंड? जाणून घ्या ITR बद्दल सर्वकाही..
income tax return file Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 19, 2025 | 1:50 PM
Share

Income Tax Return Filing : यंदा आयकर विभागाने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली होती. त्यानंतर जर तुम्ही आयटीआर भरत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. रिटर्न भरताना ई-व्हेरिफिकेशन अनिवार्य असल्याची खात्री करून घेणं महत्त्वाचं आहे. कारण ही प्रक्रिया अनिवार्य असून त्याशिवाय तुमचा आयटीआर वैध धरला जाणार नाही. आयटीआर म्हणजे काय, तो कोणी भरावा आणि कसा भरावा, त्यासाठी फॉर्म कोणकोणते असतात याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) म्हणजे काय?

तुम्हा एका आर्थिक वर्षांत किती कमाई करता आणि त्या उत्पन्नावर किती कर भरावा लागतो, याची माहिती तुम्हाला केंद्र सरकारच्या आयकर विभागाला द्यावी लागते. या उत्पन्नामध्ये केवळ पगारच नाही तर उत्पन्नाचे इतर स्रोतसुद्धा समाविष्ट असतात. उदाहरणार्थ, भाडं, शेअर बाजारातील नफा, मालमत्ता खरेदी आणि विक्रीतून मिळणारा नफा, व्याज उत्पन्न आणि इतर माहिती. उत्पन्नाचा प्रत्येत स्रोत तुम्हाला आयटीआरच्या फॉर्ममध्ये सूचीबद्ध करावा लागतो.

ITR कुणी दाखल करायचा?

इन्कम टॅक्स रिटर्न कुणी दाखल करायचा.. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बहुतांश करदात्यांना हा प्रश्न पडतो. भारतातील बरेच लोक करपात्र नाहीत, म्हणून त्यांना प्रश्न पडतो की आपण आयटीआर भरावं की नाही? नियमांनुसार वार्षित 2.5 लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना त्यांचं उत्पन्न कळवणं आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल आणि तुमचं उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असेल, तरीही आयटीआर भरलेला चांगला. कारण याचे फायदेही अनेक आहेत.

आयटीआर दाखल करण्याचे फायदे कोणते?

फक्त सरकार सांगतं म्हणून किंवा तुम्हाला दंड भरावा लागेल म्हणून तुम्ही जर आयटीआर दाखल करत असाल, तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या आयटीआरचे महत्त्वाचे फायदे अद्याप माहीतच नाहीत. आयटीआर भरला असेल तर परदेशातील प्रवासासाठी लागणारा व्हिसा, क्रेडिट कार्ड, एखादी सरकारी योजना, गृहकर्ज, घर किंवा जमिनीची नोंदणी.. अशा गोष्टींसाठी अर्ज करताना तुमची विश्वासार्हता वाढते. आयटीआर तुम्हाला तुमच्या स्वप्नांचं घर किंवा कार खरेदी करण्यासाठी कर्ज मिळवण्यास मदत करते. बँका सर्वसामान्यपणे गेल्या तीन वर्षांची तुमच्या रिटर्नची माहिती घेते. जर तुम्ही तुमचं रिटर्न दाखल केलं नसेल, तर तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठीही प्रतीक्षा करावी लागते. तुमची रिटर्न फाइल व्यवस्थित असेल, तर तुम्हाला सहजपणे कर्ज मिळू शकतो.

टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

  • पॅन कार्ड
  • कर बचत योजनेचं प्रमाणपत्र (जर असेल तर)
  • 16A/16B/16C फॉर्म
  • सॅलरी स्लिप
  • बँक स्टेटमेंट
  • टीडीएस सर्टिफिकेट
  • इंटरेस्ट सर्टिफिकेट
  • 26AS फॉर्म

आयटीआर किती प्रकारचे असतात?

वेगवेगळ्या संस्थांसाठी आयटीआर वेगवेगळे असतात. सध्या आयकर विभागाकडून करदात्यांना सात आयटीआर उपलब्ध आहेत.

ITR-1 फॉर्म

ज्यांना पगार, पेन्शन, व्याज किंवा कोणत्याही मालमत्तेतून एका आर्थिक वर्षात 50 लाख रुपयांपर्यंत उत्त्पन मिळतंय, असे सर्वजण या फॉर्मचा वापर करू शकतात.

ITR-2 फॉर्म

कोणतीही व्यक्ती किंवा HUF ज्याचं एका आर्थिक वर्षातील उत्पन्न कोणत्याही नोकरी किंवा व्यवसायातून होत नाही, ते या फॉर्मचा वापर करू शकतात.

ITR-3 फॉर्म

कोणतीही व्यक्ती किंवा HUF ज्याचं एका आर्थिक वर्षातील उत्पन्न कोणत्याही नोकरी किंवा व्यवसायातून होत असेल, तर ते या फॉर्मचा वापर रिटर्न फाइलसाठी करू शकतात.

ITR 4 फॉर्म

अशी व्यक्ती जी नोकरीतून 50 लाख रुपये आणि व्यवसायातून 2 कोटी रुपयांपर्यंतचा नफा कमावतेय, ती या फॉर्मचा वापर करू शकते.

ITR 5 फॉर्म

भागीदार आणि संघटना त्यांच्या उत्पन्नाची माहिती देण्यासाठी हा फॉर्म वापरतात.

ITR 6 फॉर्म

भारतातील कोणतीही नोंदणीकृत कंपनी तिच्या उत्पन्नाचा तपशील देण्यासाठी या फॉर्मचा वापर करते.

ITR 7 फॉर्म

विद्यापीठे, राजकीय पक्ष, ट्रस्ट, संशोधन संस्था त्यांच्या उत्पन्नाची माहिती देण्यासाठी आयटीआर 7 हा फॉर्म भरतात.

ITR ई-फायलिंगमध्ये कोणते फॉर्म वापरले जातात?

फॉर्म 16

हा फॉर्म पगार घेणाऱ्या सर्व नोकरदारांसाठी आहे. एम्प्लॉयरकडून हा फॉर्म जारी केला जातो. त्यात एकूण पगार, डिडक्शन आणि टीडीएसची माहिती असते.

फॉर्म 26AS

हे एक वार्षिक टॅक्स स्टेटमेंट आहे, ज्यामध्ये उत्पन्नावर कापलेला टीडीएस, एडव्हान्स टॅक्स आणि सेल्फ असेसमेंट यांची माहिती समाविष्ट असते.

फॉर्म 15G/15H

हा फॉर्म बँक व्याजावरील टीडीएसपासून संरक्षण देतो. ज्यांचं उत्पन्न करपात्र नाही, अशा व्यक्तींनादेखील हे लागू आहे. फॉर्म 15G हा 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे व्यक्ती वापरतात आणि फॉर्म 15H हा ज्येष्ठ नागरिक वापरतात.

ITR ऑनलाइन कसा सबमिट करायचा?

करदात्यांच्या सोयीसाठी आयकर विभागाने आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. तुम्हाला घरबसल्या आयटीआर भरता येणार आहे. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा..

  • आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal या वेबसाइटला भेट द्या.
  • तिथे तुमचा युजर आयडी आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा.
  • असेसमेंटचं वर्ष आणि आयटीआर फॉर्म निवडा.
  • कोणत्याही चुका टाळण्यासाठी आधी सर्व मार्गदर्शक तत्त्वे वाचा.
  • तुमची सर्व माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
  • आधार कार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक कोडद्वारे दिलेल्या तपशीलांची पडताळणी करा.
  • पडताळणीनंतर तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबर आणि ई-मेलवर रिटर्न फायलिंगचा मेसेज मिळेल.
  • तुम्ही पोर्टलवर पुन्हा लॉगिन करून तुमचं आयटीआर स्टेटस तपासू शकता.

ITR न भरल्यास काय दंड आहे?

आयटीआर दाखल न केल्यास किंवा उशीरा दाखल केल्यास आयकर विभागाकडून दंड आकारला जातो. जर तुमचं उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला 1 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जर तुमचं उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 5 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. परंतु हे सर्व आयटीआर फाइलिंगची अंतिम मुदत आणि विलंबावर अवलंबून असतं.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.