AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax Return साठी उरले काही तास, मुदतीनंतर दुप्पट दंडाचा दणका

Income Tax Return फाईल करण्याची मुदत संपल्यानंतर करदात्यांना मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट दंड भरावा लागेल.

Income Tax Return साठी उरले काही तास, मुदतीनंतर दुप्पट दंडाचा दणका
ITR फाईल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिलेत
| Edited By: | Updated on: Dec 30, 2020 | 11:49 AM
Share

नवी दिल्ली: आयकर रिटर्न (Income Tax Return) भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31डिसेंबर 2020 आहे. आयकर विभागानं करदात्यांना  ITR फाईल करण्याचं आवाहन केलं आहे. करदात्यांनी जर 31 डिसेंबरपूर्वी रिटर्न भरला नाही तर मोठं नुकसान होऊ शकते. रिटर्न फाईल करण्याची मुदत संपल्यानंतर करदात्यांना मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट दंड भरावा लागू शकतो. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) नं ITR फाईल करण्याची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवली होती. ( Income Tax Return filed missed then pay double fine)

साधारणपणे आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत दिली जाते. मात्र, यावर्षी कोरोना विषाणू संसर्ग असल्यामुळे मुदत वाढवली गेली होती. अजूनही ITR फाईल केला नसेल तर शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन रिटर्न फाईल करु शकता.

आयकर विभागांचं ट्विट

दंडाच्या रकमेत वाढ

मागील वर्षी दिलेल्या मुदतीत आयकर रिटर्न फाईल करायचा राहून गेल्यास 5 हजार दंड आकारण्यात आला होता. मात्र, यावर्षी 31 डिसेंबरनंतर ITR फाईल करणाऱ्यांना 10 हजार दंड भारावा लागणार आहे. हा दंड ज्या व्यक्तीचं कर पात्र उप्तन्न 50 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना भरावा लागणार आहे.

आपण प्रथमच आयटीआर दाखल करत असल्यास आपण हे काम ऑनलाइन माध्यमातून केले पाहिजे. हे काम ऑनलाइन करणे सोपे आहे आणि घरी आरामात बसून केले जाऊ शकते. पेपर मोडच्या तुलनेत ऑनलाईन आयटीआर भरणं सोपं आणि सुरक्षित आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण हे काम इंटरनेटच्या मदतीने कुठूनही करू शकता. यासाठी आपण प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. www.incometaxindiaefiling.gov.in आणि दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा. ITR फाइल करताना वापरकर्त्याच्या आयडी (PAN), संकेतशब्दासह जन्मतारीखही भरावी लागते.

आयटीआर असा करा वेरिफाई

ITR अपलोडिंग केल्यानंतर120 दिवसांमध्ये वेरिफाई करुन घेणं आवश्यक असतं.

(I) आयकर रिटर्न भरल्यानंतर ई वेरिफिकेशनसाठी आधार ओटीपी जनरेट करावा लागेल. त्यानंतर आलेला ओटीपी पोर्टलवर भरावा लागेल.

(II) यासाठी नेट बैंकिंगद्वारे ई-फाइलिंग अकाउंटमध्ये लॉगीन करावं लागेल

(III) इलेक्ट्रॉनिक वेरिफिकेशन कोड (EVC) द्वारे वेरिफिकेशन करुन ITR-V त्याची प्रत बंगळूरुला पाठवावी लागेल.

कोरोना विषाणू संसर्ग असूनही यावर्षी आयकर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आयटीआर फाईल करण्यासाठी वाढवलेली मुदत हे त्याचे कारण आहे.

झटपट प्रोसेसिंग

आयकर रिटर्न भरण्यासाठी 31 डिसेंबर अंतिम तारीख आहे. यामुळं आयकर विभागानं ‘झटपट प्रोसेसिंग‘ ही सुविधा सुरु केली आहे. तुम्ही जर आतापर्यंत आयकर रिटर्न भरला नसेल तर नव्या सुविधेचा वापर करुन लवकर आयकर रिटर्न भरु शकता. पगारदारांसाठी ही खास सुविधा सुरु करण्यात आली आहे. चार्टर्ड अकाऊंटंट चंद्रकांत मिश्रा यांच्या माहितीनुसार पगारदारासांठी आयकर भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. जे पगारदार आयकर भरणार नाहीत त्यांना 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. आयकर रिटर्न भरताना काही अडचण असल्यास सीएला संपर्क साधू शकता.

संबंधित बातम्या:

इन्कम टॅक्स भरायची डोकेदुखी?, काळजी करु नका, SBI अशी करेल तुमची मदत!

कोरोना काळातील आरोग्य तपासणीवरील खर्चावर Income Tax ची सूट, कसे? जाणून घ्या…

Income Tax Return भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस, आयकर विभागाची ‘झटपट प्रोसेसिंग’ सुविधा

( Income Tax Return filed missed then pay double fine)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.