Indane Chhotu Cylinders: नो बुकिंग, नो वेटिंग, नो डिले, छोटू सिलेंडर झटक्यात मिळणार, कुणाला खरेदी करता येणार?
Indane Chhotu Cylinders: सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा अनेक ठिकाणी सुरळीत झाला असला तरी काही ठिकाणी अजूनही एजन्सीसमोर ग्राहकांची गर्दी आहे. त्यातच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी विना झंझट एक खास सिलेंडर आणला आहे. हा छोटू सिलेंडर अनेकांसाठी या संकट काळात मदतीला येणार आहे.

Indane Chhotu Cylinders: राज्यातच नव्हे तर देशातील अनेक भागात अजूनही गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांची गर्दी झाली आहे. त्यातच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी हलक्या वजनचा छोटू सिलेंडर आणला आहे. ही सिलेंडरची संकल्पना जुणीच आहे. शहरात विविध भागातील विद्यार्थी, कामगार राहण्यासाठी येतात. विविध प्रशिक्षणासाठी अनेक जण शहरात दाखल होता. काही जण कामाच्या निमित्ताने शहरात येतात. अशा लोकांसाठी हा छोटू सिलेंडर फायद्याचा ठरतो. छोटू सिलेंडर हा 5 किलो वजनाचा आहे. विशेष म्हणजे हा छोटू सिलेंडर बुक करावा लागत नाही. त्यासाठी कुठलंही वेटिंग नाही. वाट पाहावी लागत नाही. थेट गॅस एजन्सीवर जाणून अथवा अधिकृत वितरकाकडे जाऊन ग्राहकांना गॅस सिलेंडर हंडी खरेदी करता येते.
इंडियन ऑईलने केले ट्वीट
इंडियन ऑईलने याविषयी ट्वीट केले आहे. घरगुती ग्राहकांसाठी 14.2 किलोचा गॅस सिलेंडर देण्यात येतो. प्रत्येक घरात विविध सरकारी कंपन्यांचा हा सिलेंडर घरपोच दिल्या जातो. पण त्यासाठी अगोदर बुकिंग करावे लागते. काही ग्राहक बुकिंग पेमेंट अगोदरच करतात. अथवा सिलेंडर डिलिव्हरी वेळी नगदी रक्कम मोजावी लागते. तर ज्या ग्राहकांकडे स्थानिक रहिवाशी पुरावा अथवा कुटुंब नाही अंशासाठी इंडियन ऑईलने 5KG FTL सिलेंडरची व्यवस्था केली आहे. एखाद्या किरणा दुकानावर अथवा जवळच्या इंडेन गॅस एजन्सीवर हे पाच किलोचे सिलेंडर सहज उपलब्ध आहेत. त्यासाठी ग्राहकांना कोणताही पुरावा द्यावा लागत नाही. त्यासाठी अगोदर बुकिंग करावी लागत नाही. या छोट्या इंडेन गॅस सिलेंडरविषयी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ट्वीट केले आहे.
Need a quick LPG solution without the wait?
Meet Chhotu — the handy 5 kg free trade LPG cylinder from Indane, available at Indane Gas Agencies near you. Compact, convenient, and easy to access, it is designed for moments when you need a dependable cooking companion without… pic.twitter.com/SjFqUqNDLO
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) March 30, 2026
काय आहे या सिलेंडरचे फायदे
विना गॅस कनेक्शन, विना पत्ता हा गॅस सिलेंडर सहज मिळवता येतो
सरकारद्वारे प्राप्त कोणतेही ओळखपत्र दिल्यावर छोटू सिलेंडर मिळवता येतो
छोटू सिलेंडर हा देशातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असल्याचा कंपनीचा दावा आहे
हा छोटु सिलेंडर ग्राहकांना घरपोचही मागवता येतो, पण त्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतात.
छोटू सिलेंडर प्राप्त करण्याची प्रक्रिया
छोटू सिलेंडर हा इंडेनच्या अधिकृत रिटेल आऊटलेट व्यतिरिक्त इंडेन डिस्ट्रिब्यूटरकडून सहज मिळवता येते. इंडेन डिस्ट्रीब्यूटरच्या अधिकृत पॉईंट ऑफ सेल अथवा किरणा दुकानातही हा छोटू सिलेंडर सहज मिळतो. अनेक जण या सिलेंडरचा वापर करतात. त्यामुळे घरापासून दूर असणाऱ्यांना स्वयंपाक आणि इतर पदार्थ तयार करता येतात. पाणी तापवता येते. दूध गरम करता येते.