AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India China Trade : ड्रॅगनचा पुन्हा भारतीय बाजाराला विळखा, यंदा पहिल्या 7 वर्षांतच इतका वाढला व्यापार, केंद्र सरकारच्या दाव्यांची हवाच काढली..

India China Trade : ड्रॅगनने भारतावर पुन्हा व्यापारी फास आवळला आहे..

India China Trade : ड्रॅगनचा पुन्हा भारतीय बाजाराला विळखा, यंदा पहिल्या 7 वर्षांतच इतका वाढला व्यापार, केंद्र सरकारच्या दाव्यांची हवाच काढली..
चीनची कुरघोडीImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 14, 2022 | 7:36 PM
Share

नवी दिल्ली : भारत सरकारला (Indian Government) तगडा झटका बसला आहे. एकीकडे चीन (China) सीमेवर आगळीक करत आहे. तर दुसरीकडे व्यापारात वाढ करुन त्याने भारतावर मात केली आहे. भारतीय जमिनीवर हक्क सांगणाऱ्या चीनने भारतीय व्यापारात (Indian Trading) प्रचंड घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणांची हवाच निघाली आहे. केंद्र सरकार (Central Government) आणि व्यापारी संघटनांनी चीनकडून आयात (Import) घटल्याचा दावा केला होता. पण वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीने या दाव्यांची पोलखोल केली आहे.

चीनसोबत व्यापारी तूट वाढल्याचा (India-China Trade Deficit) दावा करण्यात येत होता. पण चीन भारताचा द्विपक्षीय व्यापार (India-China Bilateral Trade) मार्च महिन्यात एक तृतीयांश वाढला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी आत्मनिर्भर भारत योजनेला (PM Modi Atma Nirbhar Abhiyan) सुरुंग लागला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकार चीनकडील आयात कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते. केंद्र सरकारने चीनी उत्पादनावर आयात शुल्कही वाढवले होते. तसेच काही मालावर करही वाढविला होता. पण तरीही आकडेवारीने चीनची भारतीय व्यापारात घुसखोरी वाढल्याचे दिसून आले.

गेल्या आठवड्यात संसदेत, वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी समोर आली. मार्च 2022 पर्यंत 12 महिन्यात भारत आणि चीनमधील एकूण व्यापार 34 टक्क्यांनी वाढला. तो आता 115.83 दशलक्ष डॉलर झाला आहे. मंत्रालयाच्या दाव्यानुसार हा आकडा गेल्यावर्षीपेक्षा वाढला आहे.

मंत्रालयानुसार, यंदा दोन्ही देशात एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्या दरम्यान 69.04 अरब डॉलरचा व्यापार झाला. याचा सरळ अर्थ की, गेल्या आर्थिक वर्षापेक्षा यंदा व्यापारात जवळपास 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात सुरुवातीच्या सात महिन्यातच हा व्यापार वाढला आहे.

मोदी सरकारने चीनवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी योजना आखली होती. 2020 मध्ये मोदी सरकारने व्यापार आणि व्यवसायावर अंकुश लावला होता. ज्या वस्तू भारतात तयार होतात. त्या चीनमधून आयात होत असताना त्यावर मोठे आयात शुल्क लावले होते. पण चीनसोबतचा व्यापार कमी करण्याची योजना यशस्वी झाली नाही.

याउलट आशियातील या मोठ्या उत्पादकाकडून भारतात आयात वाढली आहे. निर्यातही वाढली आहे. चीनसोबतचा व्यापार तोटा 51.50 दशलक्ष डॉलरवर पोहचला आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये हा आकडा 73.31 दशलक्ष डॉलर इतका होता.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.