AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत 1, ब्राझील 2…,अमेरिका अन् चीन जवळपाससुद्धा नाही, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा अहवाल

Indian Economy Growth: जगभरात भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आला आहे. 2025 मध्ये भारताचा जीडीपी 4.3 ट्रिलियन डॉलर होण्याचा अंदाज आहे. 2020 मध्ये 2.7 ट्रिलियन डॉलर होता. म्हणजेच 2020 च्या तुलनेत आता भारताच्या अर्थव्यवस्थामध्ये 60% वाढ झाली आहे.

भारत 1, ब्राझील 2...,अमेरिका अन् चीन जवळपाससुद्धा नाही, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा अहवाल
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 11, 2025 | 7:22 AM
Share

Indian Economy Growth: जगातील पहिल्या दहा अर्थव्यवस्थांचे जगातील चित्र समोर आले आहे. 2025 मधील आकडेवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केली आहे. यामध्ये जीडीपी, विकास दर आणि कर्जाच्या आधारावर त्या देशामधील परिस्थिती मांडण्यात आली आहे. अर्थात अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कायम आहे. परंतु भारत आणि ब्राझीलची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. मागील पाच वर्षांत या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा वेग सर्वाधिक राहिला आहे. चीनवर कर्ज वाढले आहे. कॅनडा, जर्मनी आणि इटलीने कर्ज कमी करण्यात यश मिळवले आहे. जपानच्या अर्थव्यवस्थेत घसरण दिसून आली आहे. हे विश्लेषण 2020 ते 2025 दरम्यान आकडेवारी आधारीत आहे.

अमेरिका, चीनची परिस्थिती काय?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार, सन 2025 मध्ये अमेरिकाचा जीडीपी 30.3 ट्रिलियन डॉलर राहण्याचा अंदाज आहे. 2020 मध्ये हा 21.4 ट्रिलियन डॉलर होता. म्हणजेच गेल्या 5 वर्षांत अमेरिकेचा जीडीपी 42% वाढला आहे. सरकारचा खर्च जास्त होत असतानाही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती चांगली आहे.

चीनची अर्थव्यवस्था 2025 मध्ये 19.5 ट्रिलियन डॉलर असण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये ही 14.9 ट्रिलियन डॉलर होती. म्हणजे मागील 5 वर्षांत चीनच्या अर्थव्यवस्थेत वाढ 31% टक्के राहिली. परंतु चीनचे कर्ज-जीडीपी प्रमाण 70% वरुन वाढून 94% टक्के झाला आहे. यामुळे वाढलेले कर्ज चीनसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

जर्मनीची अर्थव्यवस्थेत स्थिर वाढ दिसत आहे. जर्मनीचा जीडीपी 2025 मध्ये $4.9 ट्रिलियन असण्याचा अंदाज आहे. 2020 मध्ये $3.9 ट्रिलियन होता. जर्मनीचे कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर 68% वरून 62% पर्यंत घसरले आहे. हे कार्यक्षम आर्थिक व्यवस्थापनाचे लक्षण आहे.

भारताच्या जीडीपीमध्ये 60% वाढ

जगभरात भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आला आहे. 2025 मध्ये भारताचा जीडीपी 4.3 ट्रिलियन डॉलर होण्याचा अंदाज आहे. 2020 मध्ये 2.7 ट्रिलियन डॉलर होता. म्हणजेच 2020 च्या तुलनेत आता भारताच्या अर्थव्यवस्थामध्ये 60% वाढ झाली आहे. दुसरीकडे कर्ज जीडीपीचे प्रमाण कमी झाले आहे. ते 88% वरुन 83% वरुन आल्यामुळे भारताचे आर्थिक नियोजन चांगले होत असल्याचे दिसून येत आहे.

बाझीलची जोरदार कमगिरी, जपान घसरला

ब्राझीलचा जीडीपी 2020 मध्ये $1.5 ट्रिलियन होता. तो आता 2025 मध्ये $2.3 ट्रिलियन असण्याचा अंदाज आहे. म्हणजेच ब्राझील अर्थव्यवस्थेची वाढ 56% झाली आहे. कर्जाचे प्रमाण 96% वरून 92% पर्यंत कमी केले आहे. जपानाच्या अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे. 2025 मध्ये जपानचा जीडीपी 4.4 ट्रिलियन डॉलर असण्याचा अंदाज आहे. तो 2020 मध्ये 5.1 ट्रिलियन डॉलर होता. ही घसरण 13% आहे.

Follow Us
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड