लग्नच होणार होते, पण खराब सिबिल स्कोर पाहिल्यावर मोडले लग्न, महाराष्ट्रात धक्कादायक घटना
Marriage: लग्न निश्चित करणार त्याचवेळी मुलीच्या मामांनी मुलाचे सिबिल स्कोर पाहण्याची मागणी केली. त्यानंतर या लग्नात नवीन टि्वस्ट आला. जेव्हा मुलाचा सिबिल स्कोर तपासण्यात आला, तेव्हा सर्वांना धक्का बसला.

Marriage: लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असल्याचे म्हटले जाते. परंतु लेकीचे लग्न करण्यासाठी वधू पिता अनेक गोष्टींची चौकशी करत असतो. मुलगी चांगल्या घरात जावी, तिला भरपूर सुख मिळावे, यासाठी मुलाच्या परिवारातील लोक सजग असतात. परंतु अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरमध्ये लग्नासंदर्भात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिबिल स्कोर (CIBIL स्कोर) म्हणजेच क्रेडिट स्कोर खराब आल्यानंतर लग्नच मोडण्यात आले. मुलास मुलगी आणि मुलगीस मुलगा पसंत असताना सिबिल स्कोर व्हिलेन ठरला.
काय घडला प्रकार
मुर्तिजापूरमधील दोन परिवारात लग्नाची चर्चा दीर्घकाळापासून सुरु होती. मुलगा आणि मुलगी पसंत पडल्यावर लग्न ठरले. लग्नासाठी लागणाऱ्या औपचारिकतांवर बोलणी झाली. लग्न निश्चित करणार त्याचवेळी मुलीच्या मामांनी मुलाचे सिबिल स्कोर पाहण्याची मागणी केली. त्यानंतर या लग्नात नवीन टि्वस्ट आला. जेव्हा मुलाचा सिबिल स्कोर तपासण्यात आला, तेव्हा सर्वांना धक्का बसला. मुलाने अनेक बँकांतून कर्ज घेतले आहे आणि कर्जाचे हप्ते थकले असल्याचे दिसून आले. मुलाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे समोर आल्यानंतर हे लग्न मोडण्यात आले.
मुलाच्या मामांनी सांगितले…
मुलीचे मामांनी सांगितले की, मुलगा आधीपासून कर्जाच्या ओझात दाबला गेला आहे. तो आमच्या मुलीचे भविष्य कसे सुरक्षित ठेवणार? या लग्नासाठी गोत्र, कुंडली, नोकरी, सामाजिक परिस्थिती, चारित्र्य यासारख्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या होत्या. परंतु सिबिल स्कोरने गोंधळ केला. त्यानंतर हे होणारे लग्न मोडले.
मुलाची आर्थिक उत्पन्नच आता महत्वाचे नाही तर त्याचे आर्थिक नियोजनही महत्वाचे असल्याचे या प्रकरणातून समोर आले. आर्थिक जबाबदारी केवळ बँकींगसाठी महत्वाची नाही तर जीवनासाठी महत्वाचे असल्याचा धडा या प्रकरणातून मिळाला. मुर्तिजापूरमधील हे लग्न का मोडले? त्याची चर्चा परिसरात होत आहे. ग्रामीण भागात सिबिल स्कोर काय आहे? यासंदर्भात ज्येष्ठांकडून विचारणा होत आहे.
