ना मुकेश अंबानी, ना अनंत अंबानी! या व्यक्तीकडे आहे देशातील सर्वात महागडी कार, किंमत 100 कोटी रुपये

ना मुकेश अंबानी, ना अनंत अंबानी, या व्यक्तीकडे आहे देशातील सर्वात महागडी कार. एक बटण दाबताच कारचा बदलतो रंग. किंमत 1,00,00,00,000 रुपये. कोण आहे ती व्यक्ती?

ना मुकेश अंबानी, ना अनंत अंबानी! या व्यक्तीकडे आहे देशातील सर्वात महागडी कार, किंमत 100 कोटी रुपये
| Updated on: Aug 09, 2026 | 8:34 PM

मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यामुळे अंबानी कुटुंबाकडे महागड्या आणि आलिशान कारचा मोठा ताफा असणे स्वाभाविक आहे. मात्र, देशातील सर्वात महागडी कार मुकेश अंबानी यांच्याकडे नसून ती त्यांच्या पत्नी आणि उद्योगपती नीता अंबानी यांच्या नावावर असल्याचा दावा केला जातो.

रिपोर्ट्सनुसार, Audi A9 Chameleon ही कार नीता अंबानी यांच्याकडे असून तिची किंमत तब्बल 100 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ही कार आपल्या अनोख्या डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार इंजिनमुळे विशेष चर्चेत आहे.

एका बटणावर बदलतो कारचा रंग

Audi A9 Chameleon ची सर्वात खासियत म्हणजे तिचा रंग एका बटणाच्या मदतीने बदलता येतो असा दावा केला जातो. कारच्या पेंट स्कीममध्ये इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ही कार दिसायला तर आकर्षक आहेच पण तंत्रज्ञानाच्या बाबतीतही अत्यंत वेगळी ठरते. रिपोर्ट्सनुसार, जगभरात या प्रकारच्या केवळ 11 कारची विक्री झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या कारची दुर्मिळता आणि किंमत दोन्ही मोठी आहे.

या आलिशान कारमध्ये 4.0-लिटर V8 इंजिन देण्यात आल्याचे सांगितले जाते. हे इंजिन तब्बल 600 हॉर्सपॉवरची कमाल शक्ती निर्माण करू शकते. कारमध्ये दोनच दरवाजे असून तिची लांबी जवळपास 5 मीटर आहे. ही कार दिसायला देखील प्रचंड लहान असून ती खूपच आकर्षित आहे. सोशल मीडियावर तिचा लूक पाहून प्रत्येकजण कौतुक केल्याशिवाय राहत नाही.

कारच्या डिझाइनमध्येही अनेक खास गोष्टी पाहायला मिळतात. तिचे विंडशील्ड आणि रूफ एकाच डिझाइनमध्ये इंटिग्रेट करण्यात आल्याचे सांगितले जाते. याशिवाय कारमध्ये अनेक आधुनिक आणि अत्याधुनिक फीचर्स असल्याचा दावा केला जातो.

अंबानींच्या कार कलेक्शनमध्ये आणखी भर

अंबानी कुटुंबाकडे आधीपासूनच अनेक महागड्या आणि लक्झरी कार आहेत. मात्र, Audi A9 Chameleonची किंमत आणि तिचे अनोखे तंत्रज्ञान यामुळे ती सर्वाधिक चर्चेत आली आहे. त्यामुळे भारताची सर्वात महागडी कार कोणाकडे आहे? या प्रश्नाचे उत्तर सध्या नीता अंबानी यांचे नाव घेतले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us