AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugar Price Hike : ऐन सणासुदीत साखरेचा ‘शॉक’! 6 दिवसांत भाव 17 टक्क्यांनी भडकले; महाराष्ट्रात…

सणासुदीच्या काळात देशात साखरेचे भाव १३ ते १७ टक्क्यांनी वाढले आहेत. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात दर वाढले आहेत. ऊस गाळप हंगाम उशिरा सुरू झाल्याने साखरेची कमतरता आहे. सरकारचे प्रयत्नही अपुरे पडत असल्याने दिवाळीपूर्वी दर आणखी वाढण्याची भीती आहे.

Sugar Price Hike : ऐन सणासुदीत साखरेचा 'शॉक'! 6 दिवसांत भाव 17 टक्क्यांनी भडकले; महाराष्ट्रात...
Sugar Price HikeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 12:03 PM
Share

देशात सण उत्सावाचं वातावरण सुरू आहे. लोक सणासुदीसाठी खरेदी करण्यात गुंतलेले आहेत. अशावेळी डोक्याला ताप देणारी बातमी येऊन धडकली आहे. देशात पुन्हा एकदा साखरेचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या किचनचं बजेट बिघडणार आहे. केवळ गेल्या सहा दिवसातच देशातील प्रमुख राज्यांमध्ये साखरेचे भाव 13 ते 17 टक्क्याने वाढले आहेत. या सीजनमध्ये घरांपासून मिठाईच्या दुकानापर्यंत सर्वत्र साखरेची मोठी मागणी आहे. पण बाजारात साखरेचा पुरवठा अत्यंत कमी होत आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी यामुळे साखरेचे भाव गगनाला भिडले असल्याचं सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशात 6 ऑक्टोबरचे एक्स मिल रेट 4,600 रुपये प्रति क्विंटल होते, ते आता 12 ऑक्टोबर रोजी 13 टक्क्याने वाढून 5,200 रुपयांवर गेले आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, महाराष्ट्रातही काहीशी अशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात साखरेचे भाव 17 टक्क्याने वाढले आहेत. महाराष्ट्रात साखरेचा भाव 5,100 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. सणातील मागणीच्या तुलनेत साखरेचा पुरवठा अत्यंत कमी होत असल्याने साखरेचे भाव वाढल्याचं स्थानिक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

बाजारात कमतरता का?

कृषी तज्ज्ञ जी. के. सूद यांच्या मते, देशात पुरेशी साखर उपलब्ध नाहीये. दिलासा देण्यासाठी बाजारात अतिरिक्त 3 टन साखर आणण्यात आली होती. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. याशिवाय स्टॉक जमा करण्यास घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे ट्रेडला मोठा फटका बसला आहे. साधारणपणे साखर कारखाने दरवर्षी लवकर गाळप करतात. पण यावेळी गाळप हंगाम लवकर सुरू झालेला नाही. महाराष्ट्र, कर्नाटक सारख्या मोठ्या उत्पादक राज्यांमध्ये अजून ऊसाचं पीक कापणीसाठी तयार नाहीये. त्यामुळेच साखर बाजारात येण्यास उशीर होत आहे, असं सूद यांनी सांगितलं.

सरकारच्या कार्यवाहीचं काय झालं?

साखरेचं संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावलं उचलली होती. बजाारात सप्लाय वाढवण्याच्या हेतूने सरकारने 10 लाख टन कच्ची साखरेच्या ड्युटी फ्री आयातीला मंजुरी दिली होती. सोबतच डिलरांवर स्टॉक लिमिटची कठोर मर्यादा लावली होती. बल्क कंझ्युमरलाही खुल्या बाजारातून थेट साखर खरेदी करण्यावर बंदी घातली होती. तसेच साखरेची साठेबाजी करण्यावरही बंदी घालण्यात आली होती. एवढे सर्व निर्बंध लावल्यानंतरही सरकारला कोणताही दिलासा मिळताना दिसत नाहीये. एका सरकारी अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या आधी साखरेचे भाव आणखी उसळण्याची सरकारला भीती आहे.

Follow Us
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हे...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण
बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
Harshwardhan Sapkal On Sharad Pawar : बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वे
Mumbai Megablock Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक
महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत....
Pune Police : महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत प्रसिद्धीपत्रकातील चुकीने उडाली खळबळ
डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले, म्हणाले....
Sanjay Raut : सत्तेच्या लालसेपोटी विचारांची माती केली...; डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले
जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा जाहीर केला, पण लंके म्हणाले... आधी....
Nilesh Lanke : Delimitation Bill : जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा जाहीर केला, पण लंके म्हणाले... आधी विधेयकाचा मसुदा वाचणार
मविआत ठिणगी, आघाडीत मोठी फूट? पवारांच्या भूमिकेवर अंधारे संतापल्या....
Sushma Andhare : मविआत ठिणगी, आघाडीत मोठी फूट? शरद पवारांच्या भूमिकेवर सुषमा अंधारे संतापल्या, म्हणाल्या...
शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा... वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला
Vijay Wadettiwar : शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा... विजय वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला; डिलिमिटेशन विधेयकावरूनही राष्ट्रवादीला सुनावलं
देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? डिलिमिटेशन बिलात काय आहे?
Delimitation Bill : देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? लोकसभेच्या जागा वाढणार, महिलांना आरक्षण मिळणार; डिलिमिटेशन बिलात काय आहे?
त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख
Rohit Pawar : त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे?