
भारत आता ग्लोबल अल्कोहल मार्केटमध्ये वेगाने पुढे आला आहे. मद्य विक्रीमध्ये जगात भारताने इतर देशांना दे धक्का दिला आहे. अल्कोहल मार्केटमध्ये भारतीय कंपन्यांनी मोठी झेप घेतली आहे. परदेशी मद्यप्रेमींना या भारतीय ब्रँडने वेड लावले आहे. गुणवत्ता आणि लोकप्रियतेमुळे या ब्रँडने जगात मोठी मजल मारली आहे. भारताने 2025 च्या पहिल्या सहामाहीत एकूण पेय अल्कोहलया (TBA) विक्रीत सर्वाधिक वृद्धी नोंदवल्या गेली आहे.IWSR च्या अहवालानुसार, जानेवारी ते जूनपर्यंत TBA ची विक्री वर्षाधारीत 7% नी वाढून 440 दशलक्ष 9 लिटरपेक्षा अधिक आहे.
स्पिरिट्स सेगमेंटमध्ये भारतीय व्हिस्कीने सर्वाधिक विक्रीचा रेकॉर्ड केला आहे. व्हिस्कीने वार्षिक आधारावर 7% वृद्धी नोंदवली. तर व्होडकामध्ये 10%, रममध्ये 2% आणि जिन, जेनेवरमध्ये 3% इतकी वृद्धी दिसली आहे. TOI च्या ताज्या वृत्तानुसार, IWSR च्या रिसर्च हेड आशिया पॅसिफिक, सारा कॅंपबेल यांनी दावा केला की, व्हिस्की, या श्रेणीत सर्वाधिक विक्री होत आहे.
जागतिक बाजारात भारताचे स्थान
IWSR च्या सहामाही रिपोर्टनुसार, भारताने त्या 20 जागतिक बाजारात सर्वात वेगाने विक्रीचा नवीन विक्रम केला आहे. या मद्यविक्री विश्वात चीन, अमेरिका, ब्राझील, रशिया, मॅक्सिको, जर्मनी, जपान, इंग्लंड आणि इतर देशांचा समावेश आहे. भारत 2027 पर्यंत जपान आणि 2033 पर्यंत जर्मनीला मागे टाकत जगातील पाचवा सर्वाधिक अल्कोहल उत्पादक देश होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
प्रीमियम सेगमेंटमध्ये वाढ
भारतात प्रीमियम आणि त्यापेक्षा अधिक दर्जाच्या अल्कोहल सेगमेंटमध्ये पण वाढ नोंदवण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विक्री आणि विक्री मूल्यातही 8% वाढ नोंदवण्यात आली. रेडी-टू-ड्रिंक (RTD) पेय पदार्थांमध्ये सर्वात वेगवान 11% वृद्धी झाली. यानंतर बिअरमध्ये 7%, स्पिरिट्स मध्ये 6% वाढ झाली. वाईनमध्ये मोठी वृद्धी नोंदवली गेली.
या श्रेणीत मोठी वाढ
आयरिश व्हिस्कीमध्ये 23% आणि एगेव-बेस्ड स्पिरिट्समध्ये 19% वाढ झाली आहे. तर US व्हिस्कीच्या विक्रीत 100% ची घसरण आली आहे. इंडियन सिंगल माल्ट्सने स्कॉच माल्ट्समध्ये बाजी मारली आहे. ब्लेंडेड स्कॉचची विक्री स्थिर आहे. ब्रांडीमध्ये फ्लेवर्ड व्हेरिएंट आणि दक्षिणी राज्यांमध्ये ठराविक विक्री दिसली. एकूणच मद्यविक्रीत भारतीय ब्रँड्सने बाजारात धुमाकूळ घातला. त्यामुळे शेअर बाजार या कंपन्यांचे शेअर सुद्धा वधारले आहेत. त्यातूनही गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत आहे. भारतीय ब्रँडची चव आता परदेशी मद्यप्रेमींच्या जीभेवर रेंगाळत आहे. त्यातून हा उद्योग भरभराटीला आल्याचे समोर येत आहे.