AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 तासात दुसऱ्यांदा… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोने, पेट्रोल-डिझेलवरील आवाहन, थेट शेअर मार्केटची..

Stock Market Crash : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 तासात दुसऱ्यांना सोने न खरेदी करणे, पेट्रोल डिझेलच्या बचतीबद्दल मोठे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाचा परिणाम थेट शेअर बाजारात बघायला मिळत आहे. आजही भारतीय शेअर मार्केट कोसळले आहे.

24 तासात दुसऱ्यांदा... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोने, पेट्रोल-डिझेलवरील आवाहन, थेट शेअर मार्केटची..
Stock Market Crash
| Updated on: May 12, 2026 | 11:50 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दोन दिवसामध्ये दोनदा सोने खरेदी न करण्याचे, विदेशात प्रवास टाळणे, घरगुती तेलाचा वापर कमी करणे आणि पेट्रोल डिझेल वाचवण्याचे आवाहन देशातील जनतेला केले. इराण आणि अमेरिका युद्धाचा गंभीर परिणाम भारतात दिसत आहे. यादरम्यानच परकिय चलन वाचवण्याकरिता काही मोठी पाऊले उचलली जात आहेत. यादरम्यान रूपयाला सतत धक्का बसताना दिसत आहे. शेअर बाजारातील घसरण हळूहळू वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सलग दुसऱ्या दिवशीही शेअर बाजार कोसळताना दिसला. सोने न खरेदी करण्याचे आणि पेट्रोल व डिझेलचा वापर मर्यादित ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर शेअर बाजारात घसरण झाली. भारताकडून या स्थितीमध्ये पर्याय काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, यश अजिबात मिळत नसून रूपया अधिक घसरताना दिसत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30-शेअर सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांच्या घसरणीसह व्यवहार करताना दिसला.

इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस आणि इतर टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. कालपासून या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन आणि पेट्रोल व डिझेलचा मर्यादित वापर करण्याचे आवाहन करताच शेअर मार्केटमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. 24 तासात दुसऱ्यांदा याबाबत आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले.

व्यवहार सुरू झाल्यानंतर फक्त 5 मिनिटांतच बीएसई सेन्सेक्स 723 हून अधिक अंकांनी घसरून 75,291 वर पोहोचला. लाल झोनमध्ये सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच NSE Nifty देखील कोसळला. शेअर मार्केट कोसळत असताना सर्वात जास्त नुकसान आयटी कंपन्यांचे होताना दिसत आहे. आयटी कंपन्यांचे शेअर सतत खाली येताना दिसत आहेत.

मोठं मोठ्या आयटी कंपन्यांना धक्का बसत आहे. शेअर मार्केट कोसळण्याचे कारण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन असल्याचे सांगितले जात आहे. सर्वांनीच मोठा धसका घेतला आहे. काही विमान कंपन्यांचेही शेअर घसरले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर शेअर मार्केटवर गंभीर परिणाम स्पष्ट दिसत आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?