Swiss Bank : आता कोणाला द्यावी शाबासकी, भारतीयांचा इतका कमी झाला पैसा, स्विस बँकेतील

Swiss Bank : नोटबंदीच्या काळात काळे पैशांवर देशात जोरदार धुमश्चक्री झाली. ती सर्वांनीच पाहिली. काळेधन देशात येणार अशा गमजा ही मारण्यात आल्या. त्याचे काय झाले हे सांगायची गरज नाही. पण स्विस देशातून एक वार्ता हाती आली आहे. येथील बँकेतील भारतीयांचा पैसा कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

Swiss Bank : आता कोणाला द्यावी शाबासकी, भारतीयांचा इतका कमी झाला पैसा, स्विस बँकेतील
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 7:17 PM

नवी दिल्ली : 8 नोव्हेंबर 2016 ही तारीख आणि रात्री 8 वाजताची वेळ कोण भारतीय विसरेल. भारताला नोटा बदलाचा ताप माहिती आहे. त्याचवेळी काळे धन (Black Money) देशात येणार असल्याचे कोण कौतुक गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपण पाहिले आहे. त्याचे काय झाले हे सांगायची गरज नाही. आताच 2000 रुपयांची नोट मागे बोलाविण्यात आली आहे. स्विस (Swiss Bank) देशातून एक वार्ता हाती आली आहे. येथील बँकेतील भारतीयांचा पैसा कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. केंद्र सरकारने काळे धनाविरोधात उघडलेल्या मोहिमेचाच हा परिपाक असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

काळेधन झाले कमी गेल्या वर्षभरात स्विस बँकेत भारतीयांच्या जमा पैशांमध्ये घसरण आली आहे. स्वित्झर्लंडमधील केंद्रीय बँकेने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, स्विस बँकेतील भारतीयांचा वाटा कमी झाला आहे. भारतीयांचा पैसा जवळपास 11 टक्क्यांनी घसरला आहे.

इतकी घसरली रक्कम भारतीयांनी जमा केलेल्या रक्कमेत घसरण आली आहे. जवळपास 30,000 कोटी रुपये म्हणजे 3.42 अब्ज स्विस फ्रँकच आता उरले आहेत. हे आकडे समोर आल्यापासून स्विस बँकेत भारतीयांकडून जमा करण्यात येत असलेल्या रक्कमेत 34 टक्के कमी आल्याचा दावा करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

2021 मध्ये तेजी स्वित्झर्लंडमधील केंद्रीय बँकेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात काळेधनाचा उल्लेख नाही. या रिपोर्टमध्ये इतर देशांचा उल्लेख करण्यात आला नाही. तिसऱ्या देशाच्या रक्कमेबाबत काहीच माहिती देण्यात आली नाही. हे आकडे 2022 मधील आहे. त्यापूर्वी 2021 मध्ये स्विस बँकेत भारतीयांकडून रक्कम जमा करण्यात येत होती. त्यात तेजी होती. 2021मध्ये भारतीय ग्राहकांनी 3.83 अब्ज Swiss Francs रक्कम जमा केली होती. ही रक्कम त्यापूर्वीच्या 14 वर्षांमधील रक्कमेपेक्षा अधिक होती.

इतकी झाली कपात स्विस नॅशनल बँकेने (Swiss National Banks) आकडे जाहीर केले. त्यानुसार, गेल्या वर्षी भारतीयांनी जमा केलेल्या रक्कमेत 34 टक्के घसरण आली आहे. आता ही रक्कम 39.4 कोटी फ्रँक आहे. 2021 मध्ये ही रक्कम 60.2 कोटी फ्रँक होती. गेल्या वर्षी 110 कोटी फ्रँक इतर बँकिंग व्यवहारातून पाठविण्यात आले. तर 2.4 कोटी फँक हस्तांतरीत करण्यात आले. उर्वरीत 189.6 कोटी फ्रँक बाँड आणि इतर साधनातून जमा करण्यात आले.

2006 मध्ये रेकॉर्ड स्विस बँकेतील भारतीयांच्या रक्कमेत आलेली घसरण ही काळेधनाविरोधातील मोहिमेचा परिपाक असल्याचा दावा करण्यात येत आहे. यात कितपत तथ्य आहे, यावर ठोस भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 2006 मध्ये या बँकेत भारतीयांनी रेकॉर्डब्रेक कमाई जमा केली होती. त्यावेळी 6.5 अब्ज फ्रँक इतकी भारतीयांची संपत्ती होती. 2012, 2014, 2015, 2016, 2018, 2019 आणि 2022 मध्ये स्विस बँकेतील भारतीयांची रक्कम सातत्याने घसरत गेली आहे. 1713 ही स्विस राष्ट्रीय बँक स्थापन करण्यात आली.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.