Inflation: भारतात महागाईचा भडका; समजून घ्या महागाई मागचे इंडोनेशिया कनेक्शन

भारतात खाद्य तेल (Edible Oil) आणि पॅकबंद सामान महाग (Inflation) होऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक वस्तूंच्या उत्पादनामध्ये पाम तेलाचा उपयोग केला जातो. मात्र इंडोनेशियाकडून पाम तेलाची निर्यात बंद करण्यात आली आहे.

Inflation: भारतात महागाईचा भडका; समजून घ्या महागाई मागचे इंडोनेशिया कनेक्शन
भारतात महागाईचा भडका उडणार
अजय देशपांडे

|

Apr 26, 2022 | 5:30 AM

इंडोनेशियाने पाम तेलाच्या (Palm Oil) निर्यातीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. इंडोनेशियाने भारतात होणारी पाम तेलाची निर्यात बंद केली आहे. इंडोनेशिया हा पाम तेलाचा एक प्रमुख उत्पादक देश आहे. मात्र सध्या इंडोनेशियामध्येच तेलाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे इंडोनेशियाने इतर देशांना करण्यात येणारी पाम तेलाची निर्णयात बंद केली आहे. त्यामुळे आता भारतात खाद्य तेल (Edible Oil) आणि पॅकबंद सामान महाग (Inflation) होऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक वस्तूंच्या उत्पादनामध्ये पाम तेलाचा उपयोग केला जातो. इंडोनेशियाने पाम तेलाची निर्यात बंद केल्याने भारतात पाम तेलाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्यास तेलाचे दर गगनाला भिडतील आणि त्यामुळे वस्तूंच्या उत्पादनामध्ये देखील वाढ होऊ शकते. देशात आधीच पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. इंधनाच्या किमती वाढल्याने वाहतूक खर्चात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काळात महागाईचा भडका उडू शकतो.

या वस्तूंच्या निर्मितीमध्ये होतो पाम तेलाचा वापर

इंडोनेशिया हा पाम तेलाचा एक प्रमुख उत्पादक देश आहे. इंडोनेशिया अनेक देशांना पाम तेलाची निर्यात करतो. मात्र सध्या त्यांच्याकडेच तुटवडा असल्याने, इंडोनेशियाने पाम तेलाची निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका हा केवळ भारतालाच नाही तर आशियातील इतर देशांना देखील बसणार आहे. पाम ऑईलचा उपयोग हा खाण्यासाठीच नाही तर, साबन, शॉम्पू, नूडल्स, बिस्किट, चॉकटेल अशा विविध पदार्थांमध्ये होतो, त्यामुळे पाम तेलाला मोठी मागणी आहे. देशात पाम तेलाचा तुटवडा निर्माण झाल्यास संबंधित वस्तूचे दर देखील वाढू शकतात. एकटा भारत दर वर्षी तब्बल 80 लाख टन पाम तेलाची आयात करतो.

कच्च्या मालाच्या दरात वाढ

आतापर्यंत अनेक कंपन्यांनी आपल्या वस्तूंचे दर वाढवले आहेत. तर काही कंपन्या या वस्तूंचे दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने आता पूर्वीच्या किमतींमध्ये वस्तूंची विक्री परवडत नसल्याचे कंपन्यांनी सांगितले तसेच मार्जीनमध्ये देखील मोठी घट झाली आहे. अनेक वस्तूंचे भाव वाढले आहेत. पेट्रोल, डिझेल,. सीनएजी, पीएनजी, एलपीजी अशा सर्वच इंधन प्रकाराचे भाव गगनाला भिडल्याने वस्तूंच्या दरात वाढ करावी लागत असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Share Market Updates : शेअर बाजारातील पडझड कधी थांबणार? आज पुन्हा एकदा सेन्सेक्स 700 अंकानी घसरला; गुंतवणूकदारांच्या अपेक्षेवर पाणी

जीएसटीची पुन्हा लगीनघाई; नवीन वऱ्हाडींची सरबराई, 28 टक्के जीएसटीतंर्गत 143 वस्तुंचा समावेश होणार

Gold-silver prices: खुशखबर! सोने झाले स्वस्त, आजच खरेदी करा; जाणून घ्या सोन्या-चांदीचे भाव

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें