इस्त्राईल-इराण तणावाचा जगातील श्रीमंतांना फटका; मुकेश अंबानींसह गौतम अदानींचे झाले इतके नुकसान

Bloomberg Billionaire Index : Iran-Israel Tension मुळे जगभरातील शेअर बाजारात हाहाकार उडाला. त्यामुळे जगभरातील श्रीमंतांना मोठा फटका बसला. त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. टॉप 10 श्रीमंतांच्या संपत्तीत जवळपास 28 अब्ज डॉलरची घसरण झाली. केवळ हा दोन श्रीमंत नशीबवान ठरले..

इस्त्राईल-इराण तणावाचा जगातील श्रीमंतांना फटका; मुकेश अंबानींसह गौतम अदानींचे झाले इतके नुकसान
श्रीमंतांना बसला मोठा फटका
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 2:20 PM

इराण आणि इस्त्राईलमध्ये युद्धाचे सावट आहे. त्याचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम दिसला. शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली. परिणामी जगातील श्रीमंतांच्या संपत्तीत मोठी घट झाली. टॉप 10 श्रीमतांच्या संपत्तीत 28 अब्ज डॉलरची घसरण झाली. भारतीय चलनात हे मूल्य 23,39,97,82,00,000 रुपये इतके आहे. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार, जगातील टॉप 15 पैकी केवळ दोघांच्या श्रीमंतीत वाढ झाली. कोण आहेत हे नशीबवान…

हे दोघे ठरले नशीबवान

या यादीत फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या संपत्तीत सोमवारी 2.91 अब्ज डॉलरची भर पडली. त्यांची एकूण संपत्ती आता 218 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. तर जगातील 15 व्या क्रमांकाचे श्रीमंत स्पेनचे एमेंशियो ओर्टेगा यांच्या संपत्तीत 1.08 अब्ज डॉलरची वाढ झाली. सर्वाधिक फटका एलॉन मस्क याला बसला. सोमवारी त्याच्या एकूण संपत्तीत 6.84 अब्ज डॉलरची घसरण दिसली.

हे सुद्धा वाचा

हे श्रीमंत ठरले लूझर

श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरील ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची संपत्ती 3.11 अब्ज डॉलरने घसरली. त्यांच्याकडे आता 205 अब्ज डॉलर संपत्ती आहे. तिसऱ्या क्रमांकावरील एलॉन मस्क यांच्याकडे आता 178 अब्ज डॉलर संपत्ती आहे. तर चौथ्या क्रमांकावर फेसबुकची मूळ कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 4.08 अब्जने घसरुन 178 अब्ज डॉलर इतकी उरली आहे. बिल गेट्स यांच्या संपत्तीत सोमवारी 1.65 अब्ज डॉलरची घसरण झाली. ते 150 अब्ज डॉलरसह यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. स्टीव्ह बालमर यांच्या एकूण संपत्तीत 2.69 अब्ज डॉलर, लॅरी पेज यांच्या नेटवर्थमध्ये 2.43 अब्ज डॉलर, वॉरेन बफे यांच्या संपत्तीत 132 अब्ज डॉलर तर सर्गेई ब्रिन यांच्या नेटवर्थमध्ये 2.30 अब्ज डॉलरची घसरण आली.

अंबानी-अदानींना इतका फटका

भारत आणि आशियातील सर्वात मोठे श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत सोमवारी 80.6 कोटी डॉलरची घसरण झाली. ते 112 अब्ज डॉलरसह जगातील श्रीमंतांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत. या वर्षी त्यांच्या नेटवर्थमध्ये 15.6 अब्ज डॉलरची भर पडली होती. अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये सोमवारी 2.36 अब्ज डॉलरची घसरण झाली. त्यांची एकूण संपत्ती 99.5 अब्ज डॉलर इतकी आहे. श्रीमंतांच्या यादीत ते आता 14 व्या क्रमांकावर आहेत. या वर्षी त्यांच्या संपत्तीत 15.2 अब्ज डॉलरची तेजी दिसून आली.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.