ITR Refund : आयटीआर भरला, आता रिफंडची प्रतिक्षा? मग करा हे काम

जर तुमचा ITR रिफंड प्रोसेस झाले असेल पण पैसा मिळाला नसेल तर हे काम करणे गरजेचे आहे. योग्य माहिती आणि योग्य पद्धतीने तुम्ही पैसे कुठे थांबले, कुठे अडकले याची माहिती सहज मिळवू शकता, त्यासाठी अशी आहे प्रक्रिया...

ITR Refund : आयटीआर भरला, आता रिफंडची प्रतिक्षा? मग करा हे काम
आयकर रिफंड
| Updated on: Oct 11, 2025 | 10:00 AM

जर तुम्ही योग्यवेळी आयकर रिटर्न (ITR)फाईल केला असेल आणि त्याचे स्टेटस Processed असेच दाखवत असेल आणि बँक खात्यात रक्कम परत आली नसेल तर चिंता करू नका. तुम्ही एकटेच नाही तर इतरही अनेक करदात्यांना अशीच अडचण भेडसावत आहे. ITR रिफंड प्रोसेस झाले असेल पण पैसा मिळाला नसेल तर हे काम करणे गरजेचे आहे. योग्य माहिती आणि योग्य पद्धतीने तुम्ही पैसे कुठे थांबले, कुठे अडकले याची माहिती सहज मिळवू शकता, त्यासाठी अशी आहे प्रक्रिया…

7 ते 21 दिवसात रिफंडची प्रक्रिया

आयकर विभाग ITR प्रोसेस केल्यानंतर 7 ते 21 दिवसांच्या कामकाजाच्या दिवसात रिफंड मिळतो. पण अनेकदा असे होते की स्टेट्स प्रोसेस्ड दाखवते पण रिफंड रक्कम खात्यात दिसत नाही. त्यामुळे ही रक्कम कुठं अडकली याची माहिती घेणं गरजेचे आहे. ती माहिती घेतल्यास तुम्हाला रक्कम कुठं थांबली याची माहिती घेता येईल.

रिफंडची रक्कम मिळण्याची प्रक्रिया ही 4 ते 5 आठवड्यांची आहे. तुम्ही आयटीआर वेळेत दाखल केला असला तरी तो अखेरीस दाखल केला असेल तर रिफंड मिळण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. पण जर तुम्ही सुरुवातीलाच आयटीआर दाखल केला आणि अनेक आठवडे होऊनही रिफंड मिळाला नसेल तर तुम्हाला मग पुढील प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

रिफंड नाही आला? मग अगोदर फॉलो करा या स्टेप्स

सर्वात अगोदर आयकर विभागाच्या ई-फायलिंग साईटवर जा

www.incometax.gov.in/iec/foportal/ ला भेट द्या

लॉगिन करण्यासाठी OTP प्रक्रिया पूर्ण करा.

‘Refund / Demand Status’ हा पर्याय पाहा.

येथे रिफंड केव्हा प्रोसेस होईल. किती रक्कम मिळेल हे स्पष्ट होईल.

पण जर स्टेट्स ‘Processed’ दाखवत असेल, पण पैसा मिळाला नसेल

तर बँकेचा तपशील तपासा. बँकेचा खाता क्रमांक, IFSC कोडची खात्री करा.

सर्व योग्य असेल तर Refund Reissue Request नोंदवा

ही रिक्वेस्ट टाकताच रिफंडची प्रक्रिया सुरू होते.

काही दिवसातच तुमच्या बँक खात्यात रिफंडची रक्कम येते.

ITR रिफंडला उशीर कशामुळे?

रिफंडला उशीर होण्यासाठी अनेक कारणं आहेत. यामध्ये बँक खात्याचा क्रमांक अथवा IFSC कोडची चुकीची माहिती देणे, बँक खात्याचे ई-व्हेरिफिकेशन न झाल्यास, फॉर्म 26AS आणि ITR मध्ये अंतर असेल, TDS तपशील योग्य नसल्यास बँकेद्वारे रिफंड रक्कम थांबवण्यात येते अथवा नाकारण्यात येते. काही वेळा बँक खात्याला आधार लिंक नसेल तर रिफंडला उशीर होऊ शकतो.