Gold Price Today: सोने-चांदीने डाव पालटवला, मौल्यवान धातुच्या किंमतीत तुफान, जळगाव सराफा बाजारात भाव काय?

Gold And Silver Price Hike: जळगावच्या सराफा बाजारासह देशातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सोन्याने एकाच आठवड्यात डाव पालटवला आहे. काय आहेत आता किंमती?

Gold Price Today: सोने-चांदीने डाव पालटवला, मौल्यवान धातुच्या किंमतीत तुफान, जळगाव सराफा बाजारात भाव काय?
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Nov 25, 2025 | 2:15 PM

Jalgaon Sarafa Market:जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.सोन्याच्या भावात 2 हजार रुपयांनी तर चांदीच्या भावात 4 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 28 हजार 750 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 64 हजार 228 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. जळगावात सोने-चांदीच्या भावात मोठ्या दिवसांपासून चढ-उतार सुरूच आहे.

वायदे बाजारात सोन्याची मोठी झेप

देशातील वायदे बाजारात सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा गगनाला भिडल्या आहेत. देशातील वायदे बाजारात सोन्याच्या किंमतींनी 1.25 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर चांदीच्या किंमती 1.56 लाखांच्या पुढे पोहचल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या किंमतीत अजून मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकन मध्यवर्ती बँक रिझर्व्ह फेडरलच्या व्याज दर कपात धोरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर सोने आणि चांदीत मोठी उसळी आलेली दिसेल.

सोने-चांदी मोठी झेप घेणार?

अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर कपातीचे संकेत मिळत आहेत. व्याजदरात कपात होण्याची शक्यता 80 टक्क्यांपर्यंत असल्याचा दावा करण्यात येत आहे. सोमवारी अमेरिकन वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी तेजी दिसून आली. त्याचा परिणाम आज देशातील वायदे बाजारात दिसून आला. MCX वर दोन्ही धातुचे भाव वधारले.

परदेशी बाजारात सोने-चांदीची किंमत किती?

परदेशी बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ दिसून येत आहे. न्यूयॉर्क कॉमेक्स मार्केटमध्ये गोल्ड फ्युचर जवळपास 48 डॉलर प्रति औंसच्या तेजीसह 4,178.40 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत आहे. तर गोल्ड स्पॉटचा भाव जवळपास 7 डॉलर प्रति औंसच्या वाढीसह
4,143.17 डॉलर प्रति औंसवर पोहचला आहे. तर सिल्व्हर फ्युचरची किंमतीत दोन टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. चांदीचा भाव 51.93 डॉलर प्रति औंसवर पोहचला आहे. तर सिल्व्हर स्पॉटच्या किंमतीत 0.17 टक्क्यांची वाढ होऊन किंमती 51.45 डॉलरवर पोहचल्या आहेत. येत्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या किंमती अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us