AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांची अमित शाहांसोबत तब्बल तीन तास बैठक, बैठकीत नेमकं काय घडलं?

आज कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसद भवनावर मोर्चा काढाण्यात आला, दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अमित शाह यांच्यामध्ये तब्बल तीन तासांची बैठक पार पडली आहे.

धर्मेंद्र प्रधान यांची अमित शाहांसोबत तब्बल तीन तास बैठक, बैठकीत नेमकं काय घडलं?
अमित शाहांसोबत धर्मेंद्र प्रधान यांची बैठक Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 20, 2026 | 6:15 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, आज राजधानी दिल्लीमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे.  कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आज थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आल्याने आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी आंदोलकांसाठी बॅडिकेड लावले होते, परंतु आंदोलक हे बॅडिकेड ओलांडून संसदेच्या दिशेनं पुढे आले, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी आश्रुधुराचा मारा केला, तसेच लाठीचार्ज देखील करण्यात आला. हे सर्व घडत असताना दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी मंत्री जे. पी. नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

या भेटीदरम्यान कॉकोरच जनता पार्टीने सरकारकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. ज्यामध्ये  सोनम वांगचूक यांच्या आंदोलनात अडथळा न आणता त्यांची सुटका करावी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, किंवा त्यांना पदावरून काढून टाकावे आणि तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे नीट परीक्षा प्रकरणात ज्या -ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्यात यावी.

दरम्यान दुसरीकडे या सर्व घडामोडी घडत असताना सरकारदरबारी देखील हालचालींना वेग आला आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास बैठक सुरू होती.  सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर चर्चा झाली, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

आंदोलक आक्रमक 

दरम्यान आंदोलक आक्रमक झाले आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे, त्यासाठीच आज आंदोलकांनी संसद भवनावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर आश्रुधुराचा मारा देखील करण्यात आला आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी लाठीचार्जच्या देखील घटना घडल्या. विरोधी पक्षांनी आता रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पांठिबा द्यावा अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...