AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियात एकत्र कधी खेळणार? इंग्लंड वनडे मालिकेनंतर पुढे काय?

भारतीय संघाचे दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली आता फक्त वनडे फॉर्मेट खेळत आहेत. त्यामुळे इंग्लंड मालिकेनंतर आता दोन्ही दिग्गज खेळाडू मैदानात कधी उतरणार? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. पण यासाठी त्यांना बराच काळ वाट पाहावी लागणार आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियात एकत्र कधी खेळणार? इंग्लंड वनडे मालिकेनंतर पुढे काय?
रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियात एकत्र कधी खेळणार? इंग्लंड वनडे मालिकेनंतर पुढे काय?Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 20, 2026 | 6:14 PM
Share

Rohit Sharma-Virat Kohli Next Match: भारत इंग्लंड मालिका बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आली. या मालिकेत भारताची हाराकिरी झाली. टी20 मालिकेनंतर वनडे मालिकाही भारताने गमावली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारता 1-2 ने पराभव झाला. भारताने मालिका गमावली असली तर संघाचे दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना सूर गवसला आहे. विराट कोहलीने दुसऱ्या वनडे सामन्यापासून सूर पकडला. तर रोहित शर्माने शेवटच्या सामन्यात टीकाकारांची बोलती बंद केली. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 110 चेंडूत 138 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने 60 चेंडूत 74 धावा केल्या. दोन्ही दिग्गजांनी साजेशी खेळी केली, पण संघाला काही विजय मिळाला. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 387 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 360 धावांवर अडखळला आणि 27 धावांनी पराभव झाला. असं असताना आता भारतीय क्रीडाप्रेमींना रोहित शर्मा आणि विराट कोहली जोडी कधी मैदानात उतरणार? याची उत्सुकता आहे. त्यातही रोहित शर्माची या संघात निवड होईल की नाही? हा प्रश्न आहे.

टीम इंडियाची पुढची मालिका कधी?

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकत्रच टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. तसेच फक्त वनडे फॉर्मेट खेळण्याचा निर्णय घेतला. दोन्ही दिग्गज खेळाडूंचा पुढचा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा खेळण्याचा मानस आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वनडे मालिका खेळण्यावर भर आहे. आता इंग्लंड मालिका संपल्यानंतर दोन्ही दिग्गज कधी उतरतील? असा प्रश्न आहे. यासाठी क्रीडाप्रेंमी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण भारतीय संघ आता थेट सप्टेंबर महिन्यात वनडे मालिका खेळणार आहे. त्यामुळे या दोघांना पुन्हा एकत्र खेळताना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींना आणखी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. हा दौरा 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान असणार आहे. यात एकूण 3 वनडे सामने खेळणार आहेत.

भारत वेस्ट वनडे मालिकेचं वेळापत्रक

  • पहिला वनडे सामना 27 सप्टेंबरला, तिरुवनंतपुरम
  • दुसरा वनडे सामना 30 सप्टेंबरला, गुवाहाटी
  • तिसरा वनडे सामना 3 ऑक्टोबरला, न्यू चंदीगड

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार

वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत पाच वनडे सामने खेळणार आहे. ही मालिका वनडे वर्ल्डकप 2027 दृष्टीने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी महत्त्वाची असणार आहे. कारण या मालिकेत निवडलेल्या बहुतांश खेळाडूंची वनडे वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने तयारी सुरू होईल. त्यानंतर डिसेंबर महिन्यात श्रीलंकन संघ भारतात येईल आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल.

Follow Us
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
टॉप 10 दृष्य! सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर
CJP Protest | टॉप 10 दृष्य! सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
अनेक तासांचा गोंधळ... नुसती धावपळ... अखेर पोलिसांनी आंदोलकांना हटवलं
मोठी बातमी! अनेक तासांचा गोंधळ... नुसती धावपळ... अखेर पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतर मैदानातून हटवलं
अधिवेशनात पहिल्याच दिवशी वादळ! CJP च्या आंदोलनामुळे राज्यसभा 5 वेळा..
अधिवेशनात पहिल्याच दिवशी वादळ! CJP च्या आंदोलनामुळे राज्यसभा 5 वेळा स्थगित तर लोकसभा...
दिल्लीपासून राज्यात कुठे कुठे विद्यार्थ्यांचा एल्गार
CJP Protest News | राज्यसभा स्थगित... पण आंदोलन थांबलं नाही! दिल्लीपासून राज्यात कुठे कुठे विद्यार्थ्यांचा एल्गार
धर्मेंद्र प्रधान यांची अमित शाहांसोबत तब्बल तीन तास बैठक, बैठकीत नेमकं काय घडलं?.

धर्मेंद्र प्रधान यांची अमित शाहांसोबत तब्बल तीन तास बैठक, बैठकीत नेमकं काय घडलं?

संसदेत गदारोळ ते बैठकांचा धडाका…दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या घडामोडी!.

संसदेत गदारोळ ते बैठकांचा धडाका…दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या घडामोडी!

अमेरिकन स्वप्नभंग का झाले?, शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा आता युरोपकडे का ओढा ?.

अमेरिकन स्वप्नभंग का झाले?, शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा आता युरोपकडे का ओढा ?

हातात बंदूक घेऊन भर दिवसा दरोडा, पोतं भरून सोनं नेलं; पालघरमध्ये प्रचंड खळबळ.

हातात बंदूक घेऊन भर दिवसा दरोडा, पोतं भरून सोनं नेलं; पालघरमध्ये प्रचंड खळबळ

CJP Parliament March : सोनम वांगचुक यांना सोडा, सीजेपीच्या 3 मागण्या, जेपी नड्डांनी मागितला वेळ.

CJP Parliament March : सोनम वांगचुक यांना सोडा, सीजेपीच्या 3 मागण्या, जेपी नड्डांनी मागितला वेळ

जेपी नड्डा- सीजेपी यांच्यात बैठक, मिळालं पहिलं मोठं आश्वासन; दिल्लीत घडामोडी वाढल्या!.

जेपी नड्डा- सीजेपी यांच्यात बैठक, मिळालं पहिलं मोठं आश्वासन; दिल्लीत घडामोडी वाढल्या!