Jalgaon Gold Rate : लक्ष्मी पूजनाला सोने-चांदीचे महागाई दर्शन; दोन्ही धातुंची तुफान भरारी, काय आहेत किंमती
Jalgaon Sarafa Market : जळगावच्या सराफा बाजारात लक्ष्मी पूजनला सोने आणि चांदीने महागाईचे दर्शन दिले. नवीन किंमती पाहून ग्राहकांना घाम फुटला आहे. दोन्ही धातुनी तुफान भरारी घेतली. काय आहेत नवीन किंमती?

जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत तुफान आले आहे. या वर्षात मौल्यवान धातुत मोठी वाढ झाली आहे. धनत्रयोदशीपर्यंत दोन्ही धातुत मोठी पडझड झाली होती. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंमतीत तुफान येणार नाही आणि ग्राहकांना दिलासा मिळेल असा अंदाज होता. पण सराफा बाजाराने हा अंदाज खोटा ठरवला. लक्ष्मी पूजनला सोने आणि चांदीने महागाईचे दर्शन दिले. नवीन किंमती पाहून ग्राहकांना घाम फुटला आहे. दोन्ही धातुनी तुफान भरारी घेतली. काय आहेत नवीन किंमती?
सोने-चांदीचा महागाईचा झटका
साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणारा लक्ष्मीपूजनाचा आज मुहूर्त आहे. या मुहूर्तावर नागरिकांकडून सोने आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. जळगावच्या सराफ बाजारात गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत यंदा सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.
यंदा सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 33 हजार रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 70 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल 60 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात 90 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्या आणि चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाल्यामुळे यंदाची दिवाळी ही ग्राहकांची बजेट बिघडवणारी दिवाळी असल्याचे पाहायला मिळत आहे.
सोने दीड लाखांच्या घरात
लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होणार आहे. चांगला परतावा मिळाल्याने वर्षभरात चांगला परतावा मिळाल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा नागरिकांच्या कल वाढला. पुढच्या काळात सोन्याचे दर दीड लाखांपर्यंत वाढतील असा अंदाज देखील सराफ व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.
सोन्याची किंमत जाणून घ्या?
goodreturns.in नुसार, 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्यात 17 ऑक्टोबर रोजी 333 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर 1 ग्रॅम सोन्यात 200 रुपयांची घसरण आली. म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 2 हजारांनी स्वस्त झाला. गुडरिटर्न्सनुसार, आज सकाळच्या सत्रात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 30 हजार 830 रुपये इतका झाला. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 19 हजार 940 रुपये असा आहे. काल किंमतीत कोणताही बदल झाला नसल्याचे दिसते.
चांदीत घसरणीचे सत्र
चांदीने या वर्षी इतिहास रचला. एक किलो चांदी 1 लाख 85 हजारांच्या घरात पोहचली होती. गेल्या 5-6 दिवसात सोन्यात 18 हजारांची घसरण झाल्याचे गुडरिटर्न्सवरील आकडेवारीनुसार दिसून येते. 18 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात चांदीत 13 हजारांची महा घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आजच्या सकाळच्या सत्रात 1,71,900 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने वधारले आणि चांदी घसरली. 21 ऑक्टोबर रोजीच्या सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोने 1,27,630 रुपये, 23 कॅरेट 1,27,120, 22 कॅरेट सोने 1,16,70910 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 95,730 रुपये, 14 कॅरेट सोने 74,670 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,63,050 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
