Scholarship Scheme | 12वी उत्तीर्ण मुलींना 25 हजार, तर ग्रॅजुएटला 50 हजार रुपये मिळणार, ‘असा’ भर अर्ज..

यापूर्वी इंटर पास असलेल्या मुलींना दहा हजार रुपये, तर अविवाहित पदवी पास मुलींना 25 हजार रुपये देण्यात आले होते. या योजनेची संपूर्ण माहिती कल्याण पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर नमूद केलेली आहे.

Scholarship Scheme | 12वी उत्तीर्ण मुलींना 25 हजार, तर ग्रॅजुएटला 50 हजार रुपये मिळणार, ‘असा’ भर अर्ज..
मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 2:36 PM

मुंबई : बिहारमध्ये मुख्यमंत्री कन्या उत्थान योजनेची (Mukhymantri Kanya Utthan Yojana) रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत (Scholarship Scheme) पदवीधर पात्र मुलींना 50 हजार रुपये आणि इंटरमीडिएट पास अर्थात 12वी मुलींना 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत. यापूर्वी इंटर पास असलेल्या मुलींना दहा हजार रुपये, तर अविवाहित पदवी पास मुलींना 25 हजार रुपये देण्यात आले होते. या योजनेची संपूर्ण माहिती कल्याण पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर नमूद केलेली आहे.

बिहार सरकार अविवाहित मुलींच्या शिक्षण आणि इतर सुविधांसाठी ही योजना चालवत आहे. असे सांगितले जात आहे की या योजने अंतर्गत 12वी उत्तीर्ण 3.25 लाख आणि पदवीधर 80000 अविवाहित मुलींना लाभ देण्याची तरतूद केली आहे. त्याचे फायदे 1 एप्रिल 2021 पासून उपलब्ध होतील (Know how to apply for  Mukhymantri Kanya Utthan Yojana  a Scholarship scheme for girls).

क्रायटेरिया काय आहे?

बिहारमधील अविवाहित मुलींना ही रक्कम मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल. आपल्या पोर्टलवर आपल्या महाविद्यालयाचे नाव नसल्यास आपण आपल्या विद्यापीठाच्या कुलसचिवांशी संपर्क साधू शकता आणि आपल्या महाविद्यालयाचे नाव या यादीमध्ये समाविष्ट करू शकता. विद्यार्थ्याला फक्त एकदाच अर्ज भरण्यास परवानगी देण्यात येईल. या योजनेंतर्गत अर्ज भरताना ड्राफ्ट सेव्हही करू शकता.

अर्ज केल्यानंतर कृपया अर्जाचा नमुना छापून घ्या. फॉर्म भरण्यापूर्वी संपूर्ण मॅन्युअली व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, एकदा अर्ज भरल्यानंतर पुन्हा त्यात बदल करण्यात येणार नाही (Know how to apply for  Mukhymantri Kanya Utthan Yojana  a Scholarship scheme for girls).

अर्ज कसा करावा हे जाणून घ्या..

बिहार सरकारने जाहीर केलेल्या या योजनेत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम कल्याणच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. मुख्यपृष्ठावर ‘मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना 2020’च्या अर्ज करण्यासाठीच्या दुव्यावर क्लिक करा. मुख्यामंत्री कन्या उत्थान योजना 2020च्या दोन लिंक वेबसाईटवर उपस्थित असतील, आपण कोणत्याही एका दुव्यावर क्लिक करू शकता, त्यानंतर अर्जांच्या लिंकवर क्लिक करा. येथे आपल्याला आपला नोंदणी क्रमांक, एकूण ऑब्जेक्ट गुण आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल. यानंतर हा अर्ज संगणकाच्या स्क्रीनवर उघडेल. अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक वाचून पूर्ण झाल्यानंतर आपली कागदपत्रे जोडा आणि सबमिटवर क्लिक करा.

आवश्यक कागदपत्रे

मुखमंत्री कन्या उत्थान योजनेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक, इंटरमीडिएट मार्कशीट, ग्रॅज्युएशन मार्कशीट, पासपोर्ट साईज फोटो आणि रजिस्टर मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. आपण अधिकृत वेबसाईटवर या अर्जाची संपूर्ण माहिती वाचू शकता.

(Know how to apply for  Mukhymantri Kanya Utthan Yojana  a Scholarship scheme for girls)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.