
मुंबई : भारतीय शेअर बाजाराचे (stock market) बिग बुल म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला (Rakesh jhunjhunwala) यांचं निधन झालं आहे. त्यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी मुंबईमध्ये (Mumbai) झाला. राकेश झुनझुनवाला यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. मात्र त्यानंतर त्यांनी शेअर बाजारात चांगलाच जम बसवला. शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून त्यांना ओळखले जात होते. अलिकडेच ते एअरलाईन्स क्षेत्रात देखील उतरले होते. अकासा एअरलाईन्सच्या माध्यमातून प्रवाशांना कमीत कमी पैशांमध्ये चांगल्या दर्जाचा प्रवास करता येणार असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वारेन बफे म्हणून देखील ओळखले जाते. आज त्यांचं निधन झालं आहे. ते आपल्या पाठिमागे एक मोठं व्यवसायिक साम्राज्य ठेवून गेले आहेत.
राकेश झुनझुनवाला यांच्या पश्चात पत्नी रेखा झुनझुनवाला, मुलगी निष्ठा झुनझुनवाला मुलगा आर्यमान झुनझुनवाला आणि आणखी एक मुलगी आर्यवीर झुनझुनवाला असा परिवार आहे. राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती ही 40 हजार कोटींच्या आसपास आहे. आकासा एअसमध्ये सर्वाधिक शेअर हे त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचे आहेत. दोघांची मिळून अकासा एअरमध्ये एकूण 45.97 टक्के एवढी हिस्सेदारी आहे. केवळ पाच हजार रुपयांमध्ये झुनझुनवाला यांनी 40000 कोटी रुपयांचे साम्रज्य उभे केले. त्यांनी आज वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मिळत असलेल्या माहितीनुसार त्यांना बर वाटत नसल्याने मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज सकाळी पावनेसात वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने उद्योग जगतावर शोककळा पसरली आहे.
राकेश झुनझुनवाला यांचा फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये जगात 440 वा नंबर लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धाजंली अपर्ण केली आहे. राकेश झुनझुनवाला यांचं आर्थ क्षेत्रात मोठे योगदान होते. ते नेहमीच भारताच्या प्रगतीच्या विषयावर भावूक असत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.