AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GOLD RATE TODAY: सोनं लागलं भाव खायला ! लग्नसराईत सोन्याला झळाली, 50 हजार पार; जाणून घ्या- आजचे ताजे भाव

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत (MAJOR CITIES GOLD RATE) सोन्याच्या भावानं प्रति तोळा पन्नास हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 46250 आणि 24 कॅरेट सोन्याला 50450 रुपये भाव मिळाला.

GOLD RATE TODAY: सोनं लागलं भाव खायला ! लग्नसराईत सोन्याला झळाली, 50 हजार पार; जाणून घ्या- आजचे ताजे भाव
सोनं लागलं भाव खायला !Image Credit source: tv 9
| Updated on: May 16, 2022 | 8:12 PM
Share

नवी दिल्ली- जागतिक अर्थपटलावरील घडामोडींचा भारतीय बाजारपेठेवर (INDIAN SHARE MARKET) मोठा परिणाम दिसून येत आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे तेजी-घसरणीचं चित्र दिसून येत आहे. बाजार अस्थिरतेमुळं गुंतवणुकदारांचा कल सोने गुंतवणुकीकडे (GOLD INVESTMENT) पाहायला मिळाला. गेल्या तीन महिन्यांच्या भावाच्या तुलनेत आज (सोमवारी) सोन्याच्या भावानं उच्चांक गाठला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत (MAJOR CITIES GOLD RATE) सोन्याच्या भावानं प्रति तोळा पन्नास हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 46250 आणि 24 कॅरेट सोन्याला 50450 रुपये भाव मिळाला. तर मुंबईखालोखाल पुण्यानं 50 हजारांचा टप्पा गाठला. पुण्यात 22 कॅरेट सोन्याला 46329 आणि 24 कॅरेट सोन्याला 50520 रुपये भाव मिळाला.

गूड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार सोने-चांदीचे बाजारभाव पुढीलप्रमाणे-

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे 22 कॅरेटचे भाव –

  • मुंबई- 46250
  • पुणे- 46329
  • नाशिक- 46320
  • नागपूर – 46320

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे 24 कॅरेटचे भाव-

  • मुंबई -50450
  • पुणे -50520
  • नाशिक- 50320
  • नागपूर -50520

‘गोल्ड’न झळाळी:

मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 रुपयांच्या वाढीसह 49,960 रुपयांवर पोहोचली. गेल्या तीन महिन्यांपासून सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. आजच्या व्यवहाराच्या दरम्यान सोन्याला 49,930 रुपये भाव मिळाला आणि दिवसभराच्या व्यवहारदरम्यान फ्युचर्सची किंमत 0.17 टक्क्यांच्या वाढीसह प्रति 10 ग्रॅम 49,960 रुपयांवर पोहोचली.

सोने भाववाढीची कारण:

· अमेरिकन फेड रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यामुळे महागाई वाढीचे संकेत

· अमेरिका, युरोपसह जागतिक शेअर बाजार आर्थिक दबावात

· वाढत्या महागाईमुळे शेअरबाजारातून पैशांचा ओघ

· सोने खरेदीकडं सुरक्षित गुंतवणुकीचं साधन म्हणून दृष्टीकोन

· लग्नसराई व प्रमुख मुहुर्तामुळे भारतात वाढत्या सोने खरेदीला मागणी

शेअर बाजारात अस्थिरतेचं चक्र:

गेल्या आठवड्यात पाच दिवसांच्या घसरणीचा परिणामुळे शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 241.34 लाख कोटी रुपयांची घसरण झाली होती. गेल्या आठवड्यात आठवड्याच्या अखरेच्या दिवशी मार्केट कॅप 255.17 लाख कोटी रुपयांच्या स्तरावर होता. एका आठवड्यात गुंतवणुकदारांना एकूण 13.83 लाख कोटींवर पाणी सोडावं लागलं होतं. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 2042 अंक (3.72%) घसरण नोंदविली गेली. तर निफ्टी 629 अंक (3.83%) टक्क्यांची घसरण झाली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.