‘कोटक महिंद्रा बँके’ची ग्राहकांसाठी भेट, आता FD वर पूर्वीपेक्षा मिळेल जास्त नफा !

| Updated on: Apr 14, 2022 | 7:04 PM

खासगी क्षेत्रातील ‘कोटक महिंद्रा बँके’ ने मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवी असलेल्या मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले आहेत. हे सर्व कालावधीसाठी नसले तरी निवडक कालावधीच्या FD चे दर वाढवण्याचा निर्णय बॅकेतर्फे घेण्यात आला आहे.

‘कोटक महिंद्रा बँके’ची ग्राहकांसाठी भेट, आता FD वर पूर्वीपेक्षा मिळेल जास्त नफा !
केवळ 15 वर्षाचा मुलगा कमवतोय लाखों रूपये
Image Credit source: Tv9
Follow us on

कोटक महिंद्रा बँके’ च्या नियमावलीनुसार, नवीन दर देशांतर्गत / NRO / NRE मुदत ठेवींवर (term deposits) लागू होतील. परंतु, एनआरओ/एनआरई ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना लागू असणारे वाढीव व्याज दर लागू होणार नसल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे. 12 एप्रिलपासूनच वाढलेल्या एफडीच्या वाढीव व्याज दरांचा फायदा ग्राहकांना मिळू लागला आहे. कोटक महिंद्रा बँकेने 121 दिवस, 179 दिवस आणि 364 दिवसांच्या एफडीवर व्याजदरात 25 आधार अंकांची (Basis Point Interest Rate) वाढ केली आहे. आता या मुदत ठेवींवर 4.50 टक्के आणि 4.75 टक्के व्याज मिळणार आहे. बँक आता 4 वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या (More mature) परंतु 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 5.50 टक्के व्याज दर देऊ करेल, जो पूर्वी 5.45 टक्के होता. ज्यांची एफडी २ कोटींपेक्षा कमी आहे त्यांना पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळेल.

किती परतावा मिळेल

7 ते 14 दिवसांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर सर्वसामान्यांना 2.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 3 टक्के व्याज मिळत आहे. 15 ते 30 दिवसांच्या FD वर समान दर. ३१ ते ४५ दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना २.७५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ३.२५ टक्के व्याज दिले जात आहे. त्याच वेळी, 46 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर व्याजदर देखील समान आहे.

91 ते 120 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 3 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के व्याज दिले जात आहे. 121 दिवस ते 179 दिवसांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर सर्वसामान्यांसाठी 3.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 टक्के व्याजदर असेल. 180 दिवस आणि 181-269 दिवस, 270 दिवस, 271 दिवस आणि 363 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 4.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 5 टक्के व्याज मिळेल.

दुसरीकडे, कोटक महिंद्रा बँक 364 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 4.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.25 टक्के व्याज देत आहे. याशिवाय 365 ते 389 दिवसांपर्यंत FD करणाऱ्यांना 5.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 5.60 टक्के व्याज मिळेल. 390 दिवसांपेक्षा कमी (12 महिने 25 दिवस) आणि 391 दिवस आणि 23 महिन्यांच्या FD वर सर्वसामान्यांना 5.20 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.70 टक्के व्याज दिले जात आहे.