कोटक महिंद्रा बँकेचं डिलाईट प्लॅटिनम क्रेडिट कार्ड; 4500 रुपयांपर्यंत पेट्रोलच्या सवलतीसह अनेक फायदे

ग्राहक त्यांच्या सोयीचे आणि खर्चाच्या आधारे त्याच्या गरजेचे क्रेडिट कार्ड निवडू शकतात. क्रेडिट कार्डवर उपलब्ध कॅशबॅक आणि बक्षिसे खर्चाचा भार थोडा कमी करू शकतात.

कोटक महिंद्रा बँकेचं डिलाईट प्लॅटिनम क्रेडिट कार्ड; 4500 रुपयांपर्यंत पेट्रोलच्या सवलतीसह अनेक फायदे
दिवाळीपूर्वी 'या' बँकेने ग्राहकांना दिले गिफ्ट, गृकर्जाच्या व्याजदरात केली कपात

नवी दिल्लीः Credit Card: बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांनी क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी विस्तृत श्रेणी उपलब्ध करून दिलीय. ग्राहक त्यांच्या सोयीचे आणि खर्चाच्या आधारे त्याच्या गरजेचे क्रेडिट कार्ड निवडू शकतात. क्रेडिट कार्डवर उपलब्ध कॅशबॅक आणि बक्षिसे खर्चाचा भार थोडा कमी करू शकतात. असेच एक कॅशबॅक कार्ड म्हणजे कोटक महिंद्रा बँकेचे डिलाईट प्लॅटिनम क्रेडिट कार्ड आहे.

हे कार्ड आहे कॉन्टॅक्टलेस

डिलाईट प्लॅटिनम क्रेडिट कार्ड हे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड आहे. म्हणजेच पीओएस मशीनजवळ घेऊन वेव्हद्वारे किंवा टॅप करून पेमेंट केले जाते. पिन टाकण्याची गरज नाही. कॉन्टॅक्टलेस कार्डसह पिन न टाकता 5000 रुपयांपर्यंत पैसे दिले जाऊ शकतात. या क्रेडिट कार्डमध्ये अॅड ऑन क्रेडिट कार्डची सुविधाही आहे.

हे फायदे मिळतात

जेवण आणि चित्रपट खर्चावर दरमहा 10% कॅशबॅक मिळतो. परंतु यासाठी जेवण आणि मनोरंजन व्यतिरिक्त इतर श्रेणींमध्ये डिलाईट प्लॅटिनम क्रेडिट कार्डमधून बिलिंग सायकलमध्ये किमान खर्च 10,000 रुपये असावा.
मासिक बिलिंग चक्रामध्ये तुम्हाला जेवणाचे आणि मनोरंजनाचे दोन्ही व्यवहारांसह जास्तीत जास्त 600 रुपयांचे कॅशबॅक मिळेल. 4000 रुपयांपर्यंतचे जेवण आणि चित्रपट व्यवहार कॅशबॅकसाठी पात्र असतील.
दर 6 महिन्यांनी कार्ड 4 मोफत PVR तिकिटे किंवा 1.25 लाख रुपये खर्च करून 750 रुपये कॅशबॅक देते. दरवर्षी जास्तीत जास्त 8 मोफत PVR तिकिटे किंवा 1500 रुपये कॅशबॅक आहे.

इंधन भरताना फायदा होणार आणि रेल्वे तिकिट बुकिंगमध्येही सूट

डिलाईट प्लॅटिनम कार्ड वापरून 400 ते 4000 रुपयांच्या इंधन व्यवहारांवर 1% इंधन डिस्काऊंट मिळू शकतो. एका कॅलेंडर वर्षात जास्तीत जास्त इंधन डिस्काऊंट 4500 रुपये असेल. Www.irctc.co.in आणि भारतीय रेल्वे बुकिंग काउंटरवर व्यवहार झाल्यास रेल्वे डिस्काऊंट उपलब्ध होईल. एका कॅलेंडर वर्षात जास्तीत जास्त रेल्वे डिस्काऊंट 500 रुपये असेल.

डिलाईट शील्डचे फायदे

जर डिलाईट प्लॅटिनम कार्ड चोरीला गेले आणि 7 दिवसांत कळवले, तर हरवलेले कार्ड फसव्या वापरावर 1.25 लाख रुपयांचे संरक्षण मिळते. यासाठी कार्ड सापडताच ग्राहक संपर्क केंद्राला कॉल करावा लागेल आणि कार्ड निष्क्रिय/ब्लॉक करावे लागेल. तसेच विमा कंपनीकडे दावा नोंदवावा लागतो.

हे क्रेडिट कार्ड कोण घेऊ शकतो?

>> अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
>> प्राथमिक कार्डासाठी अर्जदाराचे वय 21 ते 65 वर्षे असावे.
>> क्रेडिट कार्डवर जोडण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
>> डिलाईट प्लॅटिनम कार्ड अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे उपलब्ध आहे.

कोटक महिंद्रा बँक डिलाईट प्लॅटिनम कार्डसाठी …

>> जॉयनिंग फी 1999 रुपये आहे.
>> वार्षिक शुल्क 299 रुपये आहे.
>> डिलाईट प्लॅटिनम कार्डच्या अॅड ऑन कार्डसाठी शुल्क 299 रुपये आहे.

संबंधित बातम्या

Indian Railways: 29 ऑगस्टपासून IRCTC भारत दर्शन विशेष ट्रेन चालवणार, जाणून घ्या सर्वकाही

EMI ची रक्कम तुम्हीच ठरवा, ‘या’ बँकेकडून 5 लाखांपर्यंतच्या कर्जावर उत्तम सुविधा

Kotak Mahindra Bank’s Delight Platinum Credit Card; Many benefits including petrol discount up to Rs 4500

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI