AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Land loan: केवळ जमीन खरेदीसाठी मिळते कर्ज? प्रक्रिया तरी काय?

Land Loan: घर अथवा फ्लॅट खरेदीसाठी गृहकर्ज मिळते. पण तुम्हाला जर जमिन खरेदी करायची असेल तर कर्ज मिळते का? अशावेळी बँक सहज कर्ज देते का? ही प्रक्रिया किचकट असते का, याविषयी ग्राहकांच्या मनात मोठा संभ्रम आहे.

Land loan: केवळ जमीन खरेदीसाठी मिळते कर्ज? प्रक्रिया तरी काय?
जमीन खरेदीसाठी कर्ज
| Updated on: Jun 25, 2026 | 2:53 PM
Share

Land Loan: घर अथवा सदनिका खरेदीसाठी बँका ग्राहकांना कर्ज देतात. कागदपत्रे जर व्यवस्थित असतील , त्यात त्रुटी नसेल तर कर्ज सहज उपलब्ध होते. पण जमीन खरेदी करताना बँका बारकाईने तपास करतात, त्या लवकर कर्ज देत नाही असा काहीसा संभ्रम आहे. त्यामुळे जमीन खरेदी करताना कर्ज मिळते का असा प्रश्न अनेकांना पडतो. अर्थात हे कर्ज मिळते. पण याविषयीचे नियम गृहकर्जापेक्षा थोडे वेगळे आणि अधिक कडक आहेत. काय आहे त्याची प्रक्रिया?

भूखंड खरेदीसाठी कर्ज

भूखंड खरेदीसाठी बँका कर्ज पुरवठा करतात. एनए झालेल्या जमिनीवर लवकर कर्ज मिळते. ज्या ठिकाणी घर बांधल्या जाऊ शकते अथवा रहिवास होऊ शकते असे गृहीत धरून बँका संबंधित जमीन, भूखंड खरेदीसाठी कर्ज पुरवठा करतात. पण एनए अथवा संबंधित नियमात जमीन बसत नसेल तर मात्र भूखंड खरेदीसाठी कर्ज मिळणे अवघड होते.

भूखंड खरेदीसाठी का घेतात कर्ज?

शहरातील मध्यवस्तीत घर मिळणे दुरापास्त असते. अथवा ते महाग ठरू शकते. त्यामुळे अनेक जण शहरालगत नवीन विकसीत होत असलेल्या भागात भूखंड खरेदी करून त्यावर घर बांधण्याचा निर्णय घेतात. निम्न शहरात आजही फ्लॅट संस्कृतीचा मोठा शिरकाव होऊ शकला नाही. काही शहरं विस्तारासाठी मोकळी जागा असते. अशा ठिकाणी भूखंड खरेदी करून त्यावर नंतर घराची बांधणी करण्यात येते. काहींकडे मोठी रक्कम नसते. अशावेळी अगोदर भूखंड खरेदी करून मग त्यावर जसे पैसे उपलब्ध असतील तसे घर बांधण्यात येते.

कोणत्या जमिनीवर मिळते कर्ज?

प्रत्येक जमिनीवर बँक कर्ज देत नाही. एनए झालेल्या अथवा रहिवासी योग्य जमिनीवरच बँका कर्ज देतात. म्हणजे त्या जमिनीवर निवासासाठीची स्थानिक प्रशासनाची मंजूरी मिळाली असेल नकाशा मंजूर असेल अशा ठिकाणी घराचे बांधकाम कायद्यानुसार योग्य असेल त्या जागेवर बँका कर्ज देतात. क्लिअर टायटल जमिनीसाठी बँका कर्ज देण्यास तयार होतात.

जमीन कर्ज प्रकरणाची प्रक्रिया तरी काय?

बँक कर्ज देताना तुमचे उत्पन्न, कमाई, नोकरी अथवा व्यवसाय याचा विचार करते. क्रेडिट स्कोअर तपासते. तुमच्या डोई एखादे कर्ज तर नाही ना, याची खातरजमा करते.

त्यानंतर जमीन ही रहिवास योग्य आहे का, ती एनए आहे का, या जमिनीवर घर बांधकामसाठीची परवानगी आहे का, स्थानिक प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे का, याची तपासणी होते.

सर्वात अगोदर योग्य कागदपत्रांचा एका सेट तयार करा. त्यानंतर जमिनीवर कर्जासाठी अर्ज करा. तुम्ही ऑनलाईन अथवा थेट बँक शाखेत जाऊन कर्जासाठी अर्ज करू शकता. याठिकाणी तुम्हाला उत्पन्न, तुमची वैयक्तिक माहिती, किती कर्ज हवे याची माहिती द्यावी लागते.

तुमचे ओळखपत्र, रहिवाशी पुरावा, उत्पन्नाचा स्त्रोत, जमिनीची कागदपत्रे याची प्रत दिल्यानंतर बँक पडताळणी करते. त्यानंतर मग बँक कर्ज मंजूर करते.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक