रतन टाटा यांचा बिग प्लान… 40 हजार नोकऱ्या देणार; संधी कुणाला?

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चालू आर्थिक वर्षात एक दोन हजार नव्हे तर 40 हजार नोकऱ्या देणार आहे. याचा अर्थ कंपनी रोज 110 तरुणांना जॉब देणार आहे. त्यासाठी टाटा कंपनीने खास प्लान तयार केला आहे. देशात बेरोजगारीचं महासंकट असतानाच टाटाकडून चांगली पावलं उचलली जात असल्याने देशभरातील तरुणांना दिलासा मिळाला आहे.

रतन टाटा यांचा बिग प्लान... 40 हजार नोकऱ्या देणार; संधी कुणाला?
jobs
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 15, 2024 | 8:44 PM

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या सर्वात मोठ्या कंपनीने देशातील तरुणांना मोठी खुश खबर दिली आहे. देशातील सर्वात मोठी आयटी सर्व्हिस देणारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस देशातील फ्रेशर्स तरुणांना येत्या आर्थिक वर्षात हजारो जॉब देणार आहे. देशातील आयटी सेक्टर कात टाकण्याच्या तयारीत असतानाच हा निर्णय आला आहे. यापूर्वी जून तिमाहीत म्हणजे गेल्या तीन महिन्यात या कंपनीने 5000 हून अधिक तरुणांना रोजगार दिला आहे. त्यानंतर आता टीसीएसने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. तरुणांना हजारो जॉब देण्याचा प्लानच टीसीएसने तयार केला आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस या आर्थिक वर्षात 40 हजार फ्रेशर्सला जॉब देणार आहे. याचा अर्थ कंपनी दररोज 110 फ्रेशर्सना जॉब देणार आहे. ही बातमी देशातील तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्यांना थेट आयटी कंपनीत काम करायची संधी मिळणार आहे. त्यातही फ्रेशर तरुणांना पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे. देशात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, अशा काळात हा निर्णय घेण्यात आला आहे. जाणकारांच्या मते टाटा यांनी पाऊल उचलल्यानंतर आता इतर आयटी कंपन्याही तरुणांना संधी देण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

रोज 61 तरुणांना जॉब

एप्रिलपासून जूनपर्यंतचा विचार केला तर टीसीएसने रोज किमान 61 तरुणांना जॉब दिले आहेत. आकडेवारीनुसार, टीसीएसने जून तिमाहीत 5,452 कर्मचाऱ्यांना नोकरी दिली आहे. त्यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या 606,998 एवढी झाली आहे. कंपनीने आपली रिक्रुटमेंट कॅम्पेन सुरू ठेवत चालू आर्थिक वर्षात 40,000 फ्रेशर्स तरुणांना नोकरी देण्याचा प्लान तयार केला आहे. एआयएमुळे नोकऱ्या जाणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यावर टीएसीएसचे सीएचआरओ मिलिंद लक्कड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

टेक्नॉलॉजी जॉबच्या सिनेरिओला नवीन आकार देते. टीसीएसने 4.5 टक्क्याहून अधिक 7 टक्क्यांपर्यंत सॅलरीत वाढ केली आहे. चांगली कामगिरी करणाऱ्यांना 10 ते 12 टक्के हाइक देण्यात आली आहे. सुमारे 70 टक्के लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. भारताचा आयटी सेक्टर सातत्याने विकसित होत आहे, असं लक्कड यांनी म्हटलं आहे.

कंपनीचे शेअर घसरले

टीसीएसच्या शेअरमध्ये आज किरकोळ घसरण झाली आहे. आकड्याच्या अनुसार बाजार बंद होईपर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये 16.90 रुपयाची घसरण झाली. हा शेअर 4,186 रुपयांवर बंद झाला. सकाळी हा शेअर 4,237.05 रुपयांवर होता. तर शुक्रवारी हा शेअर 4184.90 रुपयांवर होता. तर सोमवारी सकाळी शेअरमध्ये तेजी होती. सकाळी हा शेअर 4,225.60 रुपयांवर ओपन झाला.