AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पगारातून बचत करण्यासाठी जाणून घ्या 20/80 चे सूत्र, नंतर नाही होणार पश्चाताप

जर तुम्ही कुटुंबाचे प्रमुख असाल आणि सर्व जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर असतील, तर तुम्हाला आर्थिक नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जर तसे करत नसाल तर तुम्हाला भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे खूप गंभीर होण्याची गरज आहे. तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही एक सूत्र लक्षात ठेवा. ज्यामुळे तुम्ही नक्की फायद्यात राहाल.

पगारातून बचत करण्यासाठी जाणून घ्या 20/80 चे सूत्र, नंतर नाही होणार पश्चाताप
| Updated on: Sep 18, 2024 | 10:52 PM
Share

जगात अनेक लोकं आहेत जे नोकरी करतात आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना दरमहिन्याला पगार मिळतो. पण लोकांचे उत्पन्न किती वाढले तरी त्यांची बचत होत नाही. जेवढा पगार वाढतो तेव्हढा खर्च ही वाढतो. त्यामुळे महिन्याच्या शेवटची काहीच शिल्लक राहत नाही. त्याचा पगार त्याच्या खात्यात जमा होत नाही की खर्च सुरु होतो. जर तुमचाही अशा लोकांमध्ये समावेश असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण बचत न करण्याची ही सवय तुमच्या भविष्यासाठी अडचणीची ठरु शकते. जर तुम्ही कुटुंबाचे प्रमुख असाल आणि सर्व जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर असतील, तर विशेषत: तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे. अशा लोकांनी खूप गंभीर असले पाहिजे. तुम्हाला बचत करण्यात मदत करणारी पद्धत तुम्ही आता जाणून घ्या.

आर्थिक नियम सांगतो की, तुम्ही तुमच्या पगारातील 20 टक्के बचत केली पाहिजे. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट करु शकता. तुमचा पगार येताच 20 टक्के रक्कम दुसऱ्या कोणत्या खात्यात ट्रान्सफर करुन घ्या. यानंतर जे पैसे तुमच्या खात्यात राहतील तितकेच खर्च करा. जर तुमच्याकडे दुसरे खाते नसेल, तर ती रक्कम तुम्ही थेट पहिल्या आठवड्यातच गुंतवून टाका. समजा तुम्हाला 40,000 रुपये पगार मिळाला, तर 40,000 रुपयांच्या 20 टक्के म्हणजे 8,000 रुपये वाचवायचे आहेत. तुम्हाला तुमचा पगार मिळताच तुम्हाला 8,000 रुपये गुंतवावे लागतील.

गुंतवणुकीसाठी पहिला आठवडा निवडा

गुंतवणुकीसाठी कधीही फक्त पहिला आठवडा निवडला पाहिजे. कारण तुम्ही महिन्याच्या शेवटच्या महिन्यात गुंतवणूक कराल, तर तुमची बचत केलेली रक्कम कुठेतरी खर्च होईल. तुमचा पगार मिळताच तुम्ही गुंतवणूक केल्यास, तुमच्याकडे जे काही पैसे शिल्लक असतील त्यातून तुमचा खर्च भागवता येईल. कारण याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसेल. जर तुम्हाला असे वाटत असेल की 20 टक्के रक्कम गुंतवल्यानंतर, तुमचा खर्च भागवण्यासाठी तुमच्याकडे असलेली रक्कम कमी आहे, तर तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चात कपात करणे आवश्यक आहे. मात्र गुंतवणुकीच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. सुरुवातीला तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, पण हळूहळू ती तुमच्या सवयीचा भाग बनते.

कुठे गुंतवणूक करावी

आता प्रश्न असा पडतो की गुंतवणूक करायची कुठे? आजकाल आरडी, पीपीएफ, एसआयपी, म्युच्युअल फंड अशा अनेक योजना आहेत. जिथे तुम्ही गुंतवणूक करु शकतात. दीर्घकाळात मोठी रक्कम तुम्ही या माध्यमातून जोडू शकता. जर तुमची 20 टक्के रक्कम पुरेशी असेल, तर तुम्ही ती विभागून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवू शकता.

उदाहरणार्थ, रु. 8,000 पैकी तुम्ही SIP मध्ये रु. 3,000 गुंतवू शकता, रु 3,000 PPF मध्ये दीर्घ मुदतीसाठी आणि रु 2,000 मध्ये तुम्ही अल्पकालीन SIP सुरू करू शकता किंवा RD चालवू शकता. याशिवाय, जर तुम्ही EPFO ​​मध्ये योगदान देत असाल तर तुम्ही VPF द्वारे EPF मध्ये तुमचे योगदान देखील वाढवू शकता. तुम्हाला EPF मध्ये देखील खूप चांगले व्याज मिळते आणि भविष्यासाठी चांगली रक्कम जोडली जाते.

कोणत्या सवयी असाव्यात

  • या खर्चावर नियंत्रण ठेवून बचत होईल
  • तुम्हाला सिगारेट, दारू वगैरे व्यसन असेल तर ते सोडण्याचा प्रयत्न करा.
  • महिन्यातून दोनदा बाहेर जेवायला जात असाल तर एकदाच जा.
  • क्रेडिट कार्डचा वापर कमी करा
  • जर तुम्ही मित्रांसोबत पार्ट्यांमध्ये पैसे खर्च करत असाल तर या सवयीवर नियंत्रण ठेवा.
  • जर तुम्ही ऑफर्समुळे अनावश्यक खरेदी करत असाल तर या सवयीवर नियंत्रण ठेवा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.