LIC IPO : पुढील आठवडा अत्यंत महत्वाचा! आयपीओचा आकार घटणार; घोषणेकडं लक्ष

| Updated on: Apr 23, 2022 | 12:10 AM

एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) आजवरचा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षापूर्वी नोव्हेंबर महिन्यात डिजिटल कंपनी पेटीएमने आयपीओच्या माध्यमातून 18,300 कोटी रुपये उभारले होते.

LIC IPO : पुढील आठवडा अत्यंत महत्वाचा! आयपीओचा आकार घटणार; घोषणेकडं लक्ष
Image Credit source: LIC India
Follow us on

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) आयपीओची सर्वत्र चर्चा आहे. बहुप्रतीक्षीत आयपीओ साठी आगामी आठवडा महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. एलआयसी आयपीओ मध्ये महत्वाचे फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. केंद्र सरकार (CENTRAL GOVERNMENT) आयपीओचा आकार 30 हजार कोटींपर्यंत करण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीची पाच टक्के भागीदारीच्या विक्रीतून रक्कम उभारली जाईल. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) आजवरचा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षापूर्वी नोव्हेंबर महिन्यात डिजिटल कंपनी पेटीएमने आयपीओच्या माध्यमातून 18,300 कोटी रुपये उभारले होते. गुंतवणुकदारांच्या अभिप्रायानंतर (INVESTOR FEEDBACK) विमा कंपनीचे मूल्यांकन सहा लाख कोटी रुपये केले जाणार आहे.

आयपीओसाठी सर्व काही-

केंद्राच्या पहिल्या अंदाजाच्या तुलनेत निम्मे आहे. केद्र सरकारने यापूर्वी कंपनीचे मूल्यांकन 17 लाख कोटी रुपयांच्या आसपास असण्याचा अंदाज वर्तविला होता. एलआयसी आयपीओ यशस्वी बनविण्यासाठी केंद्राचं शर्थीने प्रयत्न सुरू आहेत. अँकर गुंतवणुकदारांना (ANCHOR INVESTOR) केंद्रानं निमंत्रण धाडली आहेत.

सरकारने अबूधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरेटी, जीआयसी, कॅनडाचे तीन पेन्शन फंड आणि कतार इन्व्हेस्टमेंट ऑथोरेटी आदींचा यादीत समावेश आहे. सरकारने एलआयसी आयपीओ साठी 50-60 अँकर इन्व्हेस्टर्सची निवड केली आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आयपीओ बाबत केंद्र सरकार आणि गुंतवणूकदार बँकर्सची बैठकीच्या फेऱ्या सुरू आहेत.

प्राईस बँड ते मार्केट वॅल्यू:

आयपीओचा प्राईस बँड 1,550 ते 1,700 रुपये प्रति शेअर दरम्यान असू शकतो. एलआयसी आयपीओतून केंद्र 63 हजार कोटी ते 65 हजार कोटी रुपये उभारण्याची सरकारची योजना आहे. एलआयसी आयपीओचा विस्तार सरकार 31.62 कोटींवरून 38 कोटी शेअर्सपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. ए

लआयसी आयपीओमधील 6 टक्क्यांहून अधिक हिस्सा विकण्याचा सरकारचा विचार नाही. एलआयसी आयपीओचा आकार सरकार 31.62 कोटींवरून 38 कोटी शेअर्सपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. यापूर्वी डीआरएचपी अर्थात आयपीओचा प्रस्ताव एलआयसीने सेबीकडे 13 फेब्रुवारी रोजी सादर केला होता.

तारीख पे तारीख:

‘आयपीओ’शी संबंधित सुधारित कागदपत्रे सादर झाल्यानंतर 12 मेपर्यंत हा आयपीओ यादीत सुचीबद्ध होऊ शकतो. या महिन्याच्या अखेरीस आयपीओ येण्याची शक्यता आहे. यापूर्वी हा आयपीओ मार्च 2022 अखेर येणार होता. सरकारला या आयपीओ विषयक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसीची शेअर बाजारात ( LIC Listing) 12 मेपर्यंत सूचीबद्ध होईल.