मुलांच्या भविष्यासाठी LIC ची धमाकेदार योजना, बोनससह आहे खास सुविधा

LIC ने, लहान मुलांच्या भविष्यासाठीही खास योजना आणल्या आहेत. यामध्ये तुम्ही शिक्षण, लग्न आणि इतर खर्चासाठी गुंतवणूक करू शकता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:28 AM, 25 Feb 2021
मुलांच्या भविष्यासाठी LIC ची धमाकेदार योजना, बोनससह आहे खास सुविधा
खातेधारकांनी एलआयसीच्या खात्यात असलेली रक्कम डेथ क्लेम, मॅच्युरिटी क्लेम, सर्व्हायव्हल बेनिफिट्स, प्रीमियम परतावा किंवा नुकसान भरपाई क्लेमच्या रूपात जमा केलेली असते. पण अनेक खातेधारकांना याचा विसर पडला आहे.

नवी दिल्ली : देशातली सगळ्यात मोठी जीवन विमा कंपनी भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ग्राहकांसाठी नेहमीच खास योजना आणत असते. या कंपनीमध्ये गुंतवणुकीवर मोठा फायदा होतो. आता LIC ने, लहान मुलांच्या भविष्यासाठीही खास योजना आणल्या आहेत. यामध्ये तुम्ही शिक्षण, लग्न आणि इतर खर्चासाठी गुंतवणूक करू शकता. या खास योजनेचं नाव ‘न्‍यू चि‍ल्‍ड्रन्‍स मनी बॅक प्‍लान’ (LIC New Children’s Money Back Plan) आहे. (lic policy new childrens money back plan will help to secures your childs future by offering survival benefits)

पॉलिसीबद्दल काय आहे खास ?

– या विम्याचा लाभ घेण्यासाठी किमान वय 0 वर्षे आहे.

– विमा घेण्याचं कमाल वय 12 वर्षे आहे.

– याची किमान विमा रक्कम 10,000 रुपये आहे.

– विम्याच्या रक्कमेची कोणतीही मर्यादा नाही.

– प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडर-पर्याय देखील उपलब्ध.

– मॅच्युरिटीचा कालावधी एकूण मुदत 25 वर्षे आहे.

मनी बॅक इंस्टॉलमेंट

या योजनेंतर्गत, मूल 18 वर्ष, 20 वर्षे आणि 22 वर्षांचे असेल तेव्हा विमा काढलेल्या मूलभूत रकमेपैकी 20-20 टक्के एलआयसी भरते. उर्वरित 40 टक्के रक्कम पॉलिसीधारकाची 25 वर्षे पूर्ण झाल्यावर दिली जाते. इतकंच नाहीतर सर्व थकबाकी बोनस यामध्ये दिले जातात.

मॅच्युरिटीचा फायदा

पॉलिसी मॅच्युर झाल्यानंतर यामध्ये पॉलिसीधारकाला विमा रक्कम 40 टक्के बोनससोबत मिळेल. दरम्यान, पॉलिसीच्या मुदतीमध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास मूळ रकमेच्या व्यतिरिक्त बोनस आणि शेवटच्या अतिरिक्त बोनसची रक्कम दिली जाते. मृत्यू लाभ एकूण प्रीमियम पेमेंटच्या 105 टक्के पेक्षा कमी असू शकत नाही. (lic policy new childrens money back plan will help to secures your childs future by offering survival benefits)

संबंधित बातम्या – 

PPF मध्ये ‘या’ तारखेला पैसे जमा केल्यास मिळणार बक्कळ परतावा, कसं असे व्याजाचं गणित?

10 हजार गुंतवणूक वर्षाला मिळवा 16 लाख, पोस्ट ऑफिसची सगळ्यात चांगली योजना

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा तुमच्या शहरातले आजचे दर

(lic policy new childrens money back plan will help to secures your childs future by offering survival benefits)