PPF मध्ये ‘या’ तारखेला पैसे जमा केल्यास मिळणार बक्कळ परतावा, कसं असे व्याजाचं गणित?

आयकर कायद्याच्या कलम 80 सी नुसार बचतीवर सूट देण्यात येत असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हे अधिक फायद्याचं ठरत आहे. यामुळे बचतीवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर घेतला जात नाही.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:16 AM, 25 Feb 2021
PPF मध्ये 'या' तारखेला पैसे जमा केल्यास मिळणार बक्कळ परतावा, कसं असे व्याजाचं गणित?

मुंबई : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा गुंतवणूकीचा चांगला पर्याय आहे. यामध्ये आयकर कायद्याच्या कलम 80 सी नुसार बचतीवर सूट देण्यात येत असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हे अधिक फायद्याचं ठरत आहे. यामुळे बचतीवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर घेतला जात नाही. पण तुम्हाला माहित आहे का, पीपीएफकडून अधिक लाभ मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या तारखेला दरमहा पैसे जमा करावे? (ppf deposit money before 5th of every month to maximise benefits of ppf )

महिन्याच्या प्रत्येक 5 तारखेपूर्वी पैसे जमा केल्यास पीपीएफमधील गुंतवणूकीचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. जर दरमहा पीपीएफमध्ये गुंतवणूकीची रक्कम जमा केली तर हे काम महिन्याच्या 5 तारखेपूर्वी केलं पाहिजे.

या तारखा लक्षात असुद्या

एकत्र रक्कम जमा करणाऱ्या ठेवीदारांसाठी योग्य 5 एप्रिलपूर्वी करणं चांगलं आहे. कारण, 5 तारखेच्या आधी जमा झालेल्या रकमेवर संपूर्ण महिन्याचं व्याज जोडलं जातं. महिन्याच्या 5 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पीपीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेच्या आधारावर व्याज समाविष्ट केले जाते.

पीएफमध्ये किती पैसे करू शकता गोळा ?

नवीन नियमांनुसार,पीपीएफमध्ये तुम्ही अनेक वेळा पैसे कमवू शकता. आधी ठेवींची संख्या मर्यादित होती पण आता ती वाढवण्यात आली आहे. सरकारने आर्थिक वर्षामध्ये दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करू शकत नाही असा निर्णय घेतला आहे. या योजनेत फक्त 500 रुपयांमध्ये खातं उघडता येतं. वर्षामध्ये किमान 500 रुपये जमा केले गेले तर ही योजना सुरूच आहे. सुरुवातीला हे पीपीएफ खाते 15 वर्षांसाठी आहे. 15 वर्षानंतर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही व्याजासह संपूर्ण पैसे काढू शकता.

पीपीएफ ट्रान्सफर करणं सोपं

बँकांमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खातं उघडता येतं. सुरुवातीला ते 15 वर्षांसाठी उघडलं जातं. या खात्यामध्ये 1 वर्षात कमीत कमी एकदा पैसे आणि जास्तीत जास्त वेळा पैसे जमा केले जाऊ शकतात. तुम्ही 1 वर्षात कमीतकमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. पीपीएफ योजनेतील दर तीन महिन्यांनी सरकार व्याज दर निश्चित करते. (ppf deposit money before 5th of every month to maximise benefits of ppf )

संबंधित बातम्या – 

1 लाखात सुरू करा बिझनेस; महिन्याला 2 लाख कमावा, एक नंबर आहे Business Idea

1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 50 लाख रुपये; जबरदस्त योजना

10 हजार गुंतवणूक वर्षाला मिळवा 16 लाख, पोस्ट ऑफिसची सगळ्यात चांगली योजना

(ppf deposit money before 5th of every month to maximise benefits of ppf )