AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेच्या निकालात अंदाजापेक्षा मोठा फेरबदल, तर धपकन असे आपटतील हे सेक्टर

Exit Poll 2024 : एक्झिट पोलचा पोळा नुकताच फुटला, निकाल जर अनपेक्षित आल्यास गुंतवणूकदारांना मोठा फटका बसू शकतो. बाजार मागील सरकार सत्तेत येण्याची आशा करत आहे. पण इतर पक्षांचे सरकार आल्यास बाजार मोठी प्रतिक्रिया नोंदवू शकतो.

लोकसभेच्या निकालात अंदाजापेक्षा मोठा फेरबदल, तर धपकन असे आपटतील हे सेक्टर
कशी असेल बाजाराची प्रतिक्रिया
| Updated on: Jun 02, 2024 | 9:24 AM
Share

लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाची सर्वच क्षेत्रांना उत्सुकता लागली आहे. एक्झिट पोलचा पोळा फुटला. प्रत्येकाने त्यांचा अंदाज वर्तविला आहे. पण निकाल अनपेक्षित लागला तर गुंतवणूकदारांनी काळजीने गुंतवणूक करणे गरजेचे ठरेल. निकालपूर्वीच बाजारात नफा वसुली सुरु आहे. 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान झाले. जर निकाल अनपेक्षित आले, इतर पक्षाने सरकार तयार करण्याची कवायत केली तर बाजार त्यावर तात्काळ प्रतिक्रिया देईल. काय म्हणतात बाजारातील तज्ज्ञ, काय आहे त्यांचा अंदाज?

बाजारात मोठ्या उसळीची शक्यता कमी?

ITI Mutual Fund चे मुख्य गुंतवणूक अधिकारी राजेश भाटिया यांनी त्यांचे मत नोंदवले. जर भाजप 2019 प्रमाणे बहुमताने सत्तेत परतली तर इक्विटी बाजारात तेजीचे सत्र दिसेल, असे त्यांनी सांगितले. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, करूर वैश्य बँकेचे ट्रेझरी हेड व्हीआरसी रेड्डी यांच्या मते, गुरुवारी बाजार बंद होत असताना रुपया डॉलरच्या तुलनेत 83.32 हून वाढू शकतो. तर बेंचमार्क बॉन्ड यील्ड सध्याच्या 7 टक्क्यांहून कमी होऊन 6.90-6.92 टक्क्यांवर येऊ शकतो.

बाजार सावरायला लागेल वेळ

कोटक अल्टरनेट ॲसेट मॅनेजर्सचे मुख्य नीतीकार जितेंद्र गोहिल यांनी एका धोक्याकडे इशारा केला आहे. त्यानुसार, एनडीए जर सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले तर शेअर बाजारात 20 टक्क्यांपर्यंत घसरण येऊ शकते आणि त्यानंतर बाजार सावरायला मोठा वेळ लागेल.

असा निकाल येणे तसे कमी आहे. पण गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओत विविधता आणणे आवश्यक असल्याचे गोहिल म्हणाले. त्यामुळेच जोखीम कमी होईल. निकालातील फेरबदलाचा बाजारावर स्पष्ट परिणाम दिसेल. सरकार कायम राहिले तर बाजार एका ठराविक झेप घेईल. पण विपरीत निकाल आला तर बाजारात मोठी पडझड दिसेल, असे गोहिल यांना वाटते.

10 टक्क्यांपर्यंत घसरणीची शक्यता?

आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युच्युअल फंडचे मुख्य फंड मॅनेजर मित्तुल कलावाडिया यांनी रॉयटर्सला सध्याच्या घडामोडीविषयी माहिती दिली. त्यानुसार, बाजार सध्या स्थिर सरकारची आशा करत आहे. पण जर इतर पक्षाने सरकार स्थापन्याची कवायत केली तर बाजार वेगळी प्रतिक्रिया देऊ शकतो. दीर्घकालीन गुंतवणुकीवर त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक कसा परिणाम होईल, हे भविष्यात समजेल. पण शॉर्ट टर्ममध्ये त्याचा मोठा नकारात्मक परिणाम दिसू शकेल.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आयएफए ग्लोबलचे अभिषेक गोयनका यांच्या मते, निकालानंतर लागलीच बाजारात बदल दिसेल. अनपेक्षित निकाल आल्यास बेंचमार्क शेअर बाजार सूचकांकामध्ये 10 टक्क्यांची घसरण दिसेल. तर शेअरखानचे गौरव दुआ यांच्या मते ही घसरण 15-20 टक्क्यांची असेल.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.