Lok Sabha Budget 2024 | आता मिळणार जोरदार जनाधार! लोकसभा निवडणुकीतील विजयाचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी असे सागिंतले सूत्र

| Updated on: Feb 01, 2024 | 11:48 AM

Lok Sabha Budget 2024 Latest News Updates | मोदी सरकारच्या दोन कार्यकाळात देशाने प्रगतीचा मोठा पल्ला गाठल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट भाषणात म्हटले आहे. या दहा वर्षांत मोदी सरकारने मोठा हुंकार भरला. त्यामुळे सरकारला या प्रगतीच्या जोरावर लोकसभेत मोठा विजय मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Lok Sabha Budget 2024 | आता मिळणार जोरदार जनाधार! लोकसभा निवडणुकीतील विजयाचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी असे सागिंतले सूत्र
Follow us on

नवी दिल्ली | 1 February 2024 : वर्तमानावर या सरकारला मोठा अभिमान असल्याचा आत्मविश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला. बजेट भाषणात त्यांनी मोदी सरकारच्या दोन कार्यकाळातील प्रगतीचा आलेख मांडला. या दहा वर्षात देशाने विकासाचा मोठा पल्ला गाठला. विकासासोबत जागतिक पातळीवर भारताने आत्मविश्वासाचा झेंडा गाडल्याचे त्यांनी कौतुकाने सांगितले. वर्तमानावर अभिमान असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. गरिब, महिला, शेतकरी आणि तरुणांवर या काळात सरकारने लक्ष केंद्रीत केले. त्याचा भारताला फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.

मोठा आशावाद

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या 10 वर्षांत उंच भरारी घेतली. सकारात्मक परिवर्तन दिसून आले. भारतीय अर्थव्यवस्था सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली. तर 2047 पर्यंत ही अर्थव्यवस्था गरुड भरारी घेईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. लवकरच भारतीय अर्थव्यवस्था पाचवे स्थानाकडे झेपावणार असल्याचे सरकारने आणि जागतिक एजन्सीने यापूर्वीच दावा केला आहे.

हे सुद्धा वाचा

सबका साथ सबका विकास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या सरकारने 2014 मध्ये देशाची जबाबादारी खाद्यांवर घेतली. सबका साथ, सबका विकास या नाऱ्याने सर्वांना सोबत घेऊन जाण्याची या सरकारचे धोण आहे. त्यामुळेच अनेक संकटांना यशस्वीपणे तोंड देता आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने पूर्वीपासून गरीब, महिला, शेतकरी आणि तरुणांसाठी (GYAN) खास धोरण लागू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटकांच्या विकासावर लक्ष केंद्रीत केल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या अपेक्षांवर उतरण्याचे मोठे आव्हान सरकार पूर्ण करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत विजयाचा आशिर्वाद

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचे अंतरिम बजेट सादर करत आहेत. देशाचे तरुण हे महत्वाचे आहे. सरकारला सध्याचे वर्तमान आणि उज्ज्वल भविष्याविषयी मोठी आशा आणि विश्वास आहे. आम्हाला आशा आहे की, सरकारच्या या जोरदार कामांमुळे येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला विजयाचा आशिर्वाद मिळेल.